-: दिनविशेष :-

२३ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००२

मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

१९८३

सेंट किट्स आणि नेव्हिस

‘सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

(Image Credit: Wikipedia)

१९०८

युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा

कॅनडातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना

(Image Credit: University of Alberta)

१९०५

आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी ‘कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.

१८७३

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१८४६

नेपच्यून
व्हॉयेजर - २ या घेतलेले छायाचित्र

अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. केवळ गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

(Image Credit: NASA/JPL)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५२

अंशुमान गायकवाड

अंशुमान दत्ताजीराव गायकवाड – क्रिकेटपटू, भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक (दोन वेळा)

(Image Credit: ICC Cricket)

१९४३

तनुजा

तनुजा – चित्रपट अभिनेत्री

(Image Credit: Bollywood Life)

१९२०

भालबा केळकर

प्रा. भालचंद्र वामन तथा ‘भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते, ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या नाट्यसंस्थेचे एक संस्थापक
(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

(Image Credit: दैनिक प्रहार)

१९१९

देवदत्त दाभोळकर

देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी
(मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

(Image Credit: Celebrity Born)

१९०८

रामधारी सिंह ‘दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
(मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

१९०३

युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर
(मृत्यू: २ जुलै १९५०)

१८६१

रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक
(मृत्यू: १२ मार्च १९४२)

१२१५

कुबलाई खान – मंगोल सम्राट
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१९

माधव आपटे

माधव लक्ष्मण आपटे – क्रिकेटपटू, मुंबईचे नगरपाल (१९८३)
(जन्म: ५ ऑक्टोबर १९३२)

(Image Credit: CricketMASH)

२०१४

शंकर वैद्य – साहित्यिक
(जन्म: १५ जून १९२८)

२०१२

कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल – जादूगार
(जन्म: ? ? १९२४)

२००४

डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
(जन्म: २८ जानेवारी १९२५)

१९८७

राजेन्द्र कृष्ण – गीतकार कवी व पटकथालेखक
(जन्म: ६ जून १९१९)

१९६४

भार्गवराम विठ्ठल वरेरकर तथा ‘मामा’ वरेरकर – मराठीतील पुरोगामी नाटककार आणि कादंबरीकार. संगीत नाटकांचा पारंपरिक प्रवाह जोरदार असताना युरोपियन रंगभूमीवरील नॉर्वेजिअन नाटककार इब्सेनचे तंत्र मराठी रंगभूमीवर आणण्याचा जोरदार प्रयत्न करणारे अग्रणी नाटककार. स्वतंत्र सामाजिक-समस्याप्रधान नाटकांची परंपरा मराठीत निर्माण करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी १९१७ साली हुंड्याच्या समस्येवर लिहिलेलं ‘हाच मुलाचा बाप!’ हे नाटक म्हणजे याचं ठळक उदाहरण होय. त्यांनी पुढे ‘सत्तेचे गुलाम’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सोन्याचा कळस’ अशी बरीच समस्याप्रधान सामाजिक नाटकं लिहिली. ‘जीवनासाठी कला’ ही वरेरकरांची भूमिका होती. नाटके, कांदबऱ्या, कथा, रहस्यकथा असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना ते गुरुस्थानी मानीत.
(जन्म: २७ एप्रिल १८८३)

१९३९

सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक
(जन्म: ६ मे १८५६)

१८८२

फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ३१ जुलै १८००)

१८७०

प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
>(जन्म: २८ सप्टेंबर १८०३)

१८५८

ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी
(जन्म: ८ जुलै १७८९)



Pageviews

This page was last modified on 03 October 2021 at 10:48pm