विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ‘विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर
(Image Credit: TISS)
महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ‘पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.
(Image Credit: Wikipedia)
‘लेफ्टनंट कर्नल’ (सन्माननीय) अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय, बिंजिंग ऑलिम्पिक (२००८) मध्ये त्याने १० मी. एअर रायफल शूटिंग मध्ये त्याने ही कामगिरी केली. अर्जुन पुरस्कार (२०००), मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (२००२), पद्मभूषण (२००९)
(Image Credit: BBC Sport)
शेख हसीना – बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान
माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान
लता मंगेशकर – ‘नायटिंगेल ऑफ इंडिया’, सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, संगीतकार (आनंदघन) व निर्माती, भारतरत्न (२००१), पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), लंडनच्या ‘रॉयल अल्बर्ट हॉल’ मध्ये कार्यक्रम सादर करणारी पहिली भारतीय
पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते
(मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)
शहीद भगत सिंग – क्रांतिकारक
(मृत्यू: २३ मार्च १९३१)
शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महासभेचे अध्यक्ष, देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला
(मृत्यू: ? ? ????)
प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
(मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)
मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू
(जन्म: १२ सप्टेंबर १९४८)
(Image Credit: cricket.com.au)
ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
(जन्म: २९ सप्टेंबर १९२८)
(Image Credit: Wikipedia)
माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)
(जन्म: ? ? १९२९)
डॉ. मुल्कराज आनंद – लेखक
(जन्म: १२ डिसेंबर १९०५)
श्रीधरपंत दाते – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते
मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे
(जन्म: ? ? ????)
फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (१९६५ - १९८६)
(जन्म: ११ सप्टेंबर १९१७)
(Image Credit: On This Day)
विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक
(जन्म: १ आक्टोबर १८८१)
एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
(जन्म: २० नोव्हेंबर १८८९)
लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
(जन्म: २७ डिसेंबर १८२२)
This page was last modified on 28 September 2021 at 7:25pm