-: दिनविशेष :-

२७ एप्रिल

SierraLeoneFlag

सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन

SierraLeoneFlag

महत्त्वाच्या घटना:

१९९९

एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताला प्राप्त

१९७४

राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर वॉटरगेट प्रकरणात कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली. अखेर ८ ऑगस्ट १९७४ रोजी निक्सन यांनी राजीनामा दिला.

१९६१

सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९४१

दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी ग्रीसच्या अथेन्स शहरात प्रवेश केला.

१९०८

चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरूवात झाली.

१८५४

पुण्याहुन मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२०

डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार
(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)

१९१२

जोहरा सेहगल

साहिबजादी जोहरा मुमताजुल्ला खान बेगम ऊर्फ जोहरा सेहगल – अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका
(मृत्यू: १० जुलै २०१४)

(Image Credit: Film History Pics)

१८८३

भार्गवराम विठ्ठल वरेरकर तथा ‘मामा’ वरेरकर – मराठीतील पुरोगामी नाटककार आणि कादंबरीकार. संगीत नाटकांचा पारंपरिक प्रवाह जोरदार असताना युरोपियन रंगभूमीवरील नॉर्वेजिअन नाटककार इब्सेनचे तंत्र मराठी रंगभूमीवर आणण्याचा जोरदार प्रयत्न करणारे अग्रणी नाटककार. स्वतंत्र सामाजिक-समस्याप्रधान नाटकांची परंपरा मराठीत निर्माण करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी १९१७ साली हुंड्याच्या समस्येवर लिहिलेलं ‘हाच मुलाचा बाप!’ हे नाटक म्हणजे याचं ठळक उदाहरण होय. त्यांनी पुढे ‘सत्तेचे गुलाम’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सोन्याचा कळस’ अशी बरीच समस्याप्रधान सामाजिक नाटकं लिहिली. ‘जीवनासाठी कला’ ही वरेरकरांची भूमिका होती. नाटके, कांदबऱ्या, कथा, रहस्यकथा असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना ते गुरुस्थानी मानीत.
(मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)

१८२२

युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २३ जुलै १८८५)

१७९१

सॅम्युअल मोर्स – ‘मोर्स कोड‘ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार
(मृत्यू: २ एप्रिल १८७२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१७

विनोद खन्ना
इन्कार (१९७७)

विनोद खन्ना – अभिनेते, चित्रपट निर्माते व १२ व्या, १३ व्या, १४ व्या व १६ व्या लोकसभेतील खासदार (गुरुदासपूर, पंजाब), केंद्रीय मंत्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (मरणोत्तर) विजेते (२०१८)
(जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

(Image Credit: Cinestaan)

१९८०

पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी
(जन्म: २९ ऑगस्ट १९०१)

१८९८

शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक [वैशाख शु. ६ शके १८२०]
(जन्म: २१ जुलै १८५३)

१८८२

राल्फ वाल्डो इमर्सन – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ

(जन्म: २५ मे १८०३)



Pageviews

This page was last modified on 05 October 2021 at 3:12pm