-: दिनविशेष :-

२४ एप्रिल

जलसंपत्ती दिन

जागतिक श्वान दिन


महत्त्वाच्या घटना:

२०२१

एन. व्ही. रमणा

न्यायमूर्ती नुथलापती वेंकट तथा एन. व्ही. रमणा यांनी भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.

(Image Credit: Bar and Bench)

१९९३

इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.

१९९०

हबल दुर्बिण

डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.

(Image Credit: SETI Institute)

१९७०

गाम्बियाचा ध्वज

गाम्बिया प्रजासत्ताक बनले.

(Image Credit: Britannica)

१९६८

मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.

१९६७

वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मृत्युमुखी पडलेला पहिला अंतराळवीर ठरला.

१८१५

भारतीय सैन्य दलातील सर्वात बलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरखा रेजिमेंटची स्थापना.

१८००

अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.

१७१७

अहमदनगरचा किल्ला
अहमदनगरचा किल्ला

खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला. [वैशाख व. ९, शके १६३९]

१६७४

केंजळगड

भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.

(Image Credit: Trekkerpedia)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७३

सचिन तेंडुलकर

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न, पद्मविभूषण, पद्मश्री

(Image Credit: Times of India)

१९७०

डॅमियन फ्लेमिंग

डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

(Image Credit: dnaindia.com)

१९४२

बार्बरा स्ट्रायसँड
१९८० मधील छायाचित्र

बार्बरा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका

१९३८

मॅक मोहन

मोहन माकिजानी ऊर्फ ‘मॅक मोहन’ – मोहन माकिजानी ऊर्फ मॅक मोहन हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने खलनायकाच्या किंवा खलनायकाच्या टोळक्यातील भूमिका साकारणारे अभिनेते. चेतन आनंद यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी प्रथम दिग्दर्शनास सुरुवात केली. परंतु शौकत कैफ़ी यांच्या सल्ल्यामुळे ते नंतर ते अभिनयाकडे वळले. हक़ीक़त (१९६४) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी डॉन, कर्ज़, सत्ते पे सत्ता, ज़ंजीर, रफ़ू चक्कर, खून पसीना इ. २०० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. परंतु शोले या चित्रपटातील ‘सांभा’ या भूमिकेने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ते क्रिकेटही उत्तम खेळत असत.
(मृत्यू: १० मे  २०१० - मुंबई, महाराष्ट्र, भारत )

१९२९

वसंतराव पटवर्धन – 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ, लेखक, कवी, संस्कृतचे गाढे अभ्यासक

१९२९

डेविड ब्लॅकवेल
१९९९ मधील छायाचित्र

डेविड हेरॉल्ड ब्लॅकवेल – सांख्यिकीविज्ञानी, ब्लॅकवेल-राव प्रमेयाचे सहसंशोधक. नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस वर निवड होणारे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन. कृष्णवर्णीय असल्यामुळे आपल्या कारकिर्दीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
(मृत्यू: ८ जुलै  २०१०)

(Image Credit: विकिपीडिया)

१९१९

राजकुमार

राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
(मृत्यू: १२ एप्रिल २००६)

१९१०

राजा परांजपे

राजाभाऊ दत्तात्रय तथा ‘राजा’ परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
(मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)

(Image Credit: विकिपीडिया)

१८८९

सर स्टॅफोर्ड क्रिप्स

सर स्टॅफोर्ड क्रिप्स – मजूर पक्षाचे इंग्लिश राजकारणी, बॅरिस्टर, मुत्सद्दी
(मृत्यू: २१ एप्रिल १९५२)

(Image Credit: Wikimedia Commons)

१८९६

रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ‘पाणकळा’, ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘आई आहे शेतात’, ‘गानलुब्धा’, ‘मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या. (मृत्यू: ४ जुलै १९८०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

सत्यनारायण राजू ऊर्फ ‘सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू
(जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)

१९९९

सुधेन्दू रॉय

सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक. सुजाता (१९५९), मधुमती (१९५९), बंदिनी (१९६३), मेरे मेहबूब (१९६४), सगीना (१९७५), आप की खातिर (१९७७), स्वीकार, कर्ज (१९८०), सिलसिला (१९८१), कर्मा (१९८६), चांदनी (१९८९), लम्हे (१९९१) इ. चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले. मधुमती, मेरे मेहबूब आणि सगीना चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उपहार (१९७१) आणि सौदागर (१९७३) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांना फॉरेन फिल्म या गटात त्या त्या वर्षीचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.
(जन्म: ? ? १९२१ - पाबना, पश्चिम बंगाल)

(Image Credit: विकिपीडिया)

१९९४

शंतनुराव किर्लोस्कर

शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ. त्यांचे ‘Cactus and Roses’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(जन्म: २८ मे १९०३)

(Image Credit: विकिपीडिया)

१९७४

रामधारी सिंह दिनकर

रामधारी सिंह ‘दिनकर‘ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
(जन्म: २३ सप्टेंबर १९०८)

(Image Credit: timesnext.com)

१९७२

जामिनी रॉय

(Image Credit: विकिपीडिया)

जामिनी रॉय – पद्मभूषण (१९५५) पुरस्कार विजेते चित्रकार, अवनींद्रनाथ टागोर यांचे पट्टशिष्य
(जन्म:  ११ एप्रिल १८८७)

पार्वती आणि गणेश
पार्वती आणि गणेश

१९६०

लक्ष्मण बळवंत भोपटकर

लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील, महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक, केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते. गांधीहत्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले.
(जन्म: ? ? १८६०)

(Image Credit: महाराष्ट्र नायक)

१९४२

दीनानाथ मंगेशकर

मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते
(जन्म: २९ डिसेंबर १९००)



Pageviews

This page was last modified on 10 May 2021 at 12:51pm