-: दिनविशेष :-

१७ डिसेंबर

सेवानिवृत्त दिन


महत्त्वाच्या घटना:

१९७०

जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४१

दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन

१९२८

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

१९२७

हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.

१७७७

फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.

१७१८

ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७८

रितेश देशमुख – अभिनेता

१९७२

जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल

१९४७

दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)

१९२४

गोपालन कस्तुरी – पत्रकार, ‘द हिन्दू’ या वृत्तपत्राचे संपादक
(मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)

१९११

डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.

१९०५

मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०)
(मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)

१९०१

यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ‘प्रसाद’ मासिकाचे संपादक. ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ‘दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)

१९००

मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ
(मृत्यू: ३ एप्रिल १९९८)

१८४९

बॅरिस्टर लालमोहन घोष

बॅरिस्टर लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे सहसंस्थापक आणि १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. १८८५ मध्ये त्यांनी लंडनच्या डेप्टफोर्ड (लंडन) मतदारसंघातून लिबरल पार्टीच्या तिकिटावर ब्रिटिश संसदेची निवडणूक लढवली आणि ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत उमेदवार असलेले पहिले भारतीय बनले.
(मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)

१७७८

सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २९ मे १८२९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१९

डॉ. श्रीराम लागू – ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावली’, ‘किरवंत’, ‘क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार
(जन्म: १६ नोव्हेंबर १९२७)

२०१०

देवदत्त दाभोळकर

देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी
(जन्म: २३ सप्टेंबर १९१९)

(Image Credit: Celebrity Born)

२०००

जाल पारडीवाला – अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक
(जन्म: ? ? ????)

१९८५

मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
(जन्म: २२ मार्च १९२४)

१९६५

जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – स्वतंत्र भारताच्या भूदलाचे ३ रे सरसेनापती, पद्मभूषण, महावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. निवृत्तीनंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या सायप्रस मधील शांतिसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. तेथील सेवेत असतानाच त्यांना मरण आले.
(जन्म: ३० मार्च १९०६)

१९५९

पट्टाभी सीतारामय्या
१९९७ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ‘हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
(जन्म: २४ डिसेंबर १८८० - गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)

(Image Credit: Wikipedia)

१९५६

पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
(जन्म: २३ जानेवारी १८९८)

१९३८

चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ‘प्रवासी’, ‘मॉडर्न’, ‘रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
(जन्म: ११ आक्टोबर १८७६ - चांचल, माल्डा, बांगला देश)

१९३३

थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा
(जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)

१९२७

राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
(जन्म: २३ जून १९०१)

१९०७

लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ
(जन्म: २६ जून १८२४)

१७४०

चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.
(जन्म: ? ? ????)



Pageviews

This page was last modified on 23 December 2021 at 6:24pm