समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर
सतारवादक पं. रविशंकर यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
अपोलो-१५ मोहिमेतून चंद्रावर गेलेला अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.
(Image Credit: Wikipedia)
कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.
इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (मांऊंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसर्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘वहाँ’ हा ‘प्रभात’चा चित्रपट मुंबईतील ‘मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चची स्थापना
औरंगजेब मुघल सम्राट बनला.
मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका
मुमताज – अभिनेत्री
अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
(मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
डॉ. श्रीधर भास्कर तथा ‘दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित
(मृत्यू: १० एप्रिल २०००)
मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
(मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार
(मृत्यू: २९ जून १९६६)
केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ‘चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ‘शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
(मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)
डॉ. व्ही. टी. पाटील – शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, तिसऱ्या लोकसभेतील खासदार (१९६२ - १९६७), ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक
(मृत्यू: १७ जानेवारी १९९५)
फ्रेड क्विम्बी – अमेरिकन अॅनिमेशनपट निर्माते
(मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)
धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
(मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)
लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक
(मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)
गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती
(मृत्यू: ४ जानेवारी १७५२)
मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री
(जन्म: २४ डिसेंबर १९२४ - कोटला सुलतान सिंग, पंजाब)
(Image Credit: Wikipedia)
शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले.
(जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २९ डिसेंबर १८०८)
जगन्नाथ ऊर्फ ‘नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ
(जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा
(जन्म: २२ आक्टोबर १६८९)
This page was last modified on 23 December 2021 at 5:57pm