भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
‘बँक ऑफ इंग्लंड’ला स्वायत्तता देण्यात आली. १९४६ मध्ये क्लेमंट अॅटली सरकारने या बँकेचे राष्ट्रीयीकरण केले होते.
इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते इंग्लिश खाडीखालुन जाणार्या आणि इंग्लंड व फ्रान्स यांना जोडणार्या‘युरो टनेल’चे उद्घाटन झाले.
(Image Credit: Railway News)
एक पेनी किमतीचे ‘पेनी ब्लॅक’ नावाचे जगातील पहिले (चिकटवण्याचे) टपाल तिकीट इंग्लंडमध्ये विक्रीसाठी खुले झाले. हे तिकीट १ मे १८४० रोजी जारी झाले होते.
(Image Credit: विकिपीडिया)
राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली. [वैशाख शु. १ शके १७४०]
शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
टोनी ब्लेअर – ब्रिटनचे पंतप्रधान (२ मे १९९७ ते २७ जून २००७) आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष
(Image Credit: विकिपीडिया)
लीला सॅमसन – भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका आणि लेखिका. पद्मश्री (१९९०), संगीत नाटक अकादमी पारितोषिक (२०००), नृत्य चुडामणी (२००५) इ. अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित कलाकार. संगीत नाटक अकादमी आणि फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा
(Image Credit: Harmony India)
मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)
(Image Credit: विकिपीडिया)
सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व मनोविश्लेषक, आधुनिक मानसशास्त्राचा जनक
(मृत्यू: २३ सप्टेंबर १९३९)
(Image Credit: विकिपीडिया)
चौधरी अजित सिंग – केंद्रीय मंत्री, १५ व्या लोकसभेतील खासदार (मथुरा), राष्ट्रीय लोकदल या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष, पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे चिरंजीव
(जन्म: १२ फेब्रुवारी १९३९)
(Image Credit: विकिपीडिया)
प्रतीक चौधरी – सानिया घराण्याचे सतारिये, दिल्ली विद्यापीठातील संगीताचे प्राध्यापक (कोविड-१९)
(जन्म: ७ सप्टेंबर १९७१)
(Image Credit: @1anuradhapal)
उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
(जन्म: २५ नोव्हेंबर १९३९)
कृष्णाजी शंकर हिंगवे – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य
(जन्म:? ? ????)
आचार्य गोविंदराव गोसावी – प्रवचनकार, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ? ? ????)
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री (१९२१–२३), अबकारी खात्याचे मंत्री (१९२७), इंडियन कौन्सिलचे सभासद (१९२७–३२), लखनौ व पुणे विद्यापीठांचे कुलगुरू (अनुक्रमे १९३२–३८ व १९५६–५९)
व ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त (१९४४–४७) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. पुणे नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. ब्रिटिश सरकारने कैसर-इ-हिंद सुवर्णपदक
(१९१६) व नाइटहूड (१९४२) देऊन त्यांचा गौरव केला.
(जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)
(Image Credit: नवाकाळ)
मारिया टेकला आर्टेमिसिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ‘माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात.
(जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)
(Image Credit: विकिपीडिया)
भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ‘गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल
त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती.
(जन्म: १३ आक्टोबर १८७७)
(Image Credit: Live Law)
छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक
(जन्म: २६ जून १८७४)
हेन्री डेव्हिड थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत, निसर्गवादी
(जन्म: १२ जुलै १८१७)
(Image Credit: Geo. F. Parlow., Public domain, via Wikimedia Commons)
रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तान सेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्न
(जन्म: ? ? १५०६)
(Image Credit: विकिपीडिया)
This page was last modified on 28 May 2021 at 2:43pm