-: दिनविशेष :-

१२ मार्च


महत्त्वाच्या घटना:

२००१

राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला.

१९९९

सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

१९९९

चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ‘नाटो’ (NATO) मधे सामील झाले.

१९९३

मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी.

१९९२

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.

१९९१

जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी

१९६८

मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला.

१९३०

ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.

१९१८

रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.

१९१२

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१३

यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)

१९११

दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ‘भाऊसाहेब‘ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
(जन्म: १२ ऑगस्ट १९७३)

१८९१

चिंतामण गणेश तथा ‘नटवर्य‘ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९५९

१८२४

गुस्ताव्ह किरचॉफ

गुस्ताव्ह रॉबर्ट किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १७ आक्टोबर १८८७)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक
(जन्म: २५ मे १९२७)

१९९९

यहुदी मेन्युहीन

यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक
(जन्म: २२ एप्रिल १९१६)

(Image Credit: Wikimedia Commons)

१९४२

रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक
(जन्म: २३ सप्टेंबर १८६१)Pageviews

This page was last modified on 16 October 2021 at 9:32pm