-: दिनविशेष :-

५ आक्टोबर


महत्त्वाच्या घटना:

१९९८

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर

१९८९

मीरासाहेब फ़ातिमा बीबी

मीरासाहेब फ़ातिमा बीबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

१९६२

डॉक्टर नो

‘डॉक्टर नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.

१९५५

पंडित नेहरुंच्या हस्ते ‘हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

१९१०

पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

१८६४

एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७५

केट विन्स्लेट

केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री

(Image Credit: Everett Collection)

१९६९

पं. संजीव अभ्यंकर – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक

१९३२

माधव आपटे

माधव लक्ष्मण आपटे – क्रिकेटपटू, मुंबईचे नगरपाल (१९८३)
(मृत्यू: २३ सप्टेंबर २०१९)

(Image Credit: CricketMASH)

१९२३

कैलाशपती मिश्रा
२०१६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

कैलाशपती मिश्रा – गुजरातचे १५ वे राज्यपाल (७ मे २००३ ते १२ जुलै २००४), बिहारचे अर्थमंत्री (१९७७), भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (१९९५ ते २००३), बिहार भाजपाचे भीष्मपितामह, जनसंघ व भाजपाचे नेते.
(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२ - पाटणा, बिहार)

(Image Credit: Wikipedia)

१९२२

यदुनाथ थत्ते

यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, ‘साधना’ मासिकाचे संपादक
(मृत्यू: १० मे १९९८)

(Image Credit: Wikipedia)

१८९०

किशोरीलाल मशरुवाला

किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ, लेखक, चरित्रकार व भाषांतरकार. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ‘हरिजन’चे संपादक होते.
(मृत्यू: ९ सप्टेंबर १९५२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

स्टीव्ह जॉब्ज

स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
(जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)

(Image Credit: The Verge)

१९९७

चित्त बसू – संसदपटू, ‘फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
(जन्म: २५ डिसेंबर १९२६)

१९९२

अप्पासाहेब पंत

बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
(जन्म: ११ सप्टेंबर १९१२)

(Image Credit: औंध.इन्फो)

१९९१

रामनाथ गोएंका – ‘इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते
(जन्म: ३ एप्रिल १९०४)

१९९०

रामकुमार वर्मा

रामकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३). त्यांचे ‘वीर हमीद’, ‘निशीथ’, ‘चितोड की चिता’ इ. काव्यसंग्रह, ‘एकलव्य’ हे खंडकाव्य, ‘पृथ्वीराज की आँखे’, ‘रेशमी टाई’, ‘सप्तकिरण’, ‘शिवाजी’ इ. एकांकिका संग्रह व अनेक नाटके प्रसिद्ध आहेत.
(जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

(Image Credit: Wikipedia)

१९८३

अर्ल टपर – ‘टपरवेअर’चा संशोधक
(जन्म: २८ जुलै १९०७)

१९८१

भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक
(जन्म: ३० ऑगस्ट १९०३)Pageviews

This page was last modified on 25 December 2021 at 6:24pm