-: दिनविशेष :-

२८ जानेवारी


महत्त्वाच्या घटना:

२०१०

१९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

१९७७

मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८६

चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.

१९६१

एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

१९४२

दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

१६४६

मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

निकोलस पॉल स्टीफन सारकॉझी तथा निकोलस सारकॉझी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

१९३७

सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका. त्यांनी हिन्दी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी, उरिया इ. अनेक भाषांत गाणी गायिली आहेत.

१९३०

पं. जसराज – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
(मृत्यू: १७ ऑगस्ट २०२०)

१९२५

डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
(मृत्यू: २३ सप्टेंबर २००४)

१८९९

फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख
(मृत्यू: १५ मे १९९३)

१८६५

‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी
(मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)

१४५७

हेन्‍री (सातवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २१ एप्रिल १५०९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२१

शंकर सारडा

शंकर सारडा – साहित्यिक व समीक्षक. सारडा यांनी ६० हून अधिक पुस्तकं लिहिली असून, दोन हजांराहून अधिक पुस्तकांचं समीक्षण केलं आहे.
(जन्म: ४ सप्टेंबर १९३७)

(Image Credit: शंकर सारडा)

२००७

ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार
(जन्म: १६ जानेवारी १९२६)

१९९७

डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१)
(जन्म: २७ जुलै १९११)

१९९६

बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ
(जन्म: २५ डिसेंबर १९११ - शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)

१९८४

सोहराब मोदी

सोहराब मेहेरबानजी मोदी – भारतातील चित्रपट निर्मितीचे आद्यप्रवर्तक, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ‘मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले.
(जन्म: २ नोव्हेंबर १८९७)

(Image Credit:  @cinemaazi)

१८५१

बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले.
(जन्म: १० जानेवारी १७७५)

१६१६

पाच लाख ओव्यांची रचना करणारे दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ संत दासोपंत समाधिस्थ
(जन्म: २४ सप्टेंबर १५५१)

१५४७

हेन्‍री (आठवा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: २८ जून १४९१)Pageviews

This page was last modified on 02 November 2021 at 1:39pm