पु. ल. देशपांडे यांना ‘त्रिदल’ संस्थेच्या वतीने ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान
गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.
दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात
पंडित जुगलकिशोर शुक्ल यांनी ‘उदन्त मार्तण्ड’ हे हिंदीतील पहिले वर्तमानपत्र (साप्ताहिक) कलकत्ता येथून सुरु केले. हे दर मंगळवारी प्रकाशित होत असे. पहिल्या अंकाच्या ५०० प्रति छापल्या होत्या. अखेर बऱ्याच अडचणींना तोंड न देता आल्यामुळे १९ डिसेंबर १८२७ रोजी अंकाचे प्रकाशन बंद करावे लागले.
हेन्री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.
परेश रावळ – हिंदी आणि बंगाली चित्रपटांतील अभिनेते, विनोदी कलाकार आणि निर्माते, १६ व्या लोकसभेतील भाजपाचे खासदार [अहमदाबाद (पूर्व)]
(Image Credit: Filmfare)
सुरेश हरिप्रसाद जोशी – आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक. त्यांनी काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजराथीत अनुवादही केले.
(मृत्यू: ६ सप्टेंबर १९८६)
दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार
(मृत्यू: १५ जानेवारी १९७१ - मुंबई)
डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार
(मृत्यू: १० जुलै १९६९)
डॉ. विना मझुमदार – डाव्या विचारसरणीच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ, सेंटर फॉर विमेन्स डेव्हलपमेंट स्टडीज (CWDS) या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा. त्यांचे ‘मेमॉयर्स ऑफ अ रोलिंग स्टोन’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे.
(जन्म: २८ मार्च १९२७ - कलकत्ता)
(Image Credit: Wikipedia)
संत दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, ‘मंजील-ए-नूर’ आणि ‘मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना ऊर्दू अकादमीचे पुरस्कार मिळाले.
(जन्म: १४ सप्टेंबर १९२१)
(Image Credit: Wikipedia)
बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या
(जन्म: १९ जानेवारी १९३६)
सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार
(जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)
नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक
(जन्म: ५ जून १८७९)
प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) – थायलँडचा राजा
(जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)
विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते
(जन्म: १६ एप्रिल १८६७)
व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक
(जन्म: २१ नोव्हेंबर १९६४)
चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २७ जून १५५०)
फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्या ‘जोन ऑफ आर्क’ला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती ‘द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते.
(जन्म: ६ जानेवारी १४१२)
This page was last modified on 12 September 2021 at 8:22pm