दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.
मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले. ही मराठी पत्रकारितेची सुरवात मानली जाते. त्याप्रित्यर्थ हा ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
(Image Credit: Amit Paranjape)
कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.
शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.
ए. आर. रहमान – संगीतकार
कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक
रोवान अॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक
डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ, ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष
रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
(मृत्यू: १९ जून १९९८)
खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार
(मृत्यू: १० एप्रिल १९३१)
गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ‘भक्तिरसामृत’, ‘भक्तकथामृत’ आणि ‘संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)
बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले.
(मृत्यू:
१८ मे १८४६)
‘जोन ऑफ आर्क’ – फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणारी. ती ‘द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते. आधी तिला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले.
(मृत्यू: ३० मे १४३१)
ओम पुरी – अभिनेता
(जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक
(जन्म: १६ जुलै १९४३)
‘विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार
(जन्म: १ फेब्रुवारी १८८४)
ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक
(जन्म: १९ जुलै १८९६)
प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
(जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)
थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: १४ सप्टेंबर १९०१ ते ४ मार्च १९०९), नोबेल शांतता पारितोषिक (१९०६) विजेते
(जन्म: २७ आक्टोबर १८५८)
(Image Credit: The White House)
जी. कँटर – जर्मन गणितज्ञ
(जन्म: ३ मार्च १८४५)
भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ‘भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.
(जन्म: ९ सप्टेंबर १८५०)
(Image Credit: Wikipedia)
:
लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक
(जन्म: ४ जानेवारी १८०९)
त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार
(जन्म: ४ मे १७६७)
जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी
(जन्म: ? ? ????)
This page was last modified on 26 October 2021 at 8:38pm