संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ‘तानसेन सन्मान’ जाहीर
पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. १४ मार्च १९२७ रोजी या कंपनीची स्थापना होऊन १९ ऑक्टोबर १९२७ रोजी तिच्या कामकाजास सुरुवात झाली होती.
(Image Credit: Wikimedia Commons)
सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला (Operation Trident). या हल्ल्यात पी. एन. एस. खैबर या बलाढ्य युद्धनौकेसह चार पाकिस्तानी नौका आणि शेकडो सैनिकांना जलसमाधी मिळाली. या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ‘भारतीय नौदल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
थुंबा येथील तळावरुन ‘रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण
मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’चे उद्घाटन झाले. ३१ मार्च १९१३ रोजी या वास्तूच्या बांधमाकास सुरुवात झाली होती.
(Image Credit: Cultural India)
शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक
(मृत्यू: २० जुलै १९९५)
इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान
(मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२)
आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी
(मृत्यू: २७ जानेवारी २००९)
मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल’ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते
(मृत्यू: १७ जून १९६५)
सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक
(मृत्यू: १८ जून १९०२)
बॉब विलीस – इंग्लिश जलदगती गोलंदाज
(जन्म: ३० मे १९४९)
बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ‘शशी कपूर’ – अभिनेता
(जन्म: १८ मार्च १९३८)
शंकर केशव कानेटकर ऊर्फ ‘कवी गिरीश’
(जन्म: २८ आक्टोबर १८९३ - फत्यापूर, सातारा)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी
(जन्म: १८ मे १०४८)
This page was last modified on 27 October 2021 at 10:39am