‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ‘परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.
उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
अमेरिकेतील ‘थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.
रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली.
तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.
क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
<[चैत्र शु. ८]
नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू, कप्तान व समालोचक
डॉ. विना मझुमदार – डाव्या विचारसरणीच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ, सेंटर फॉर विमेन्स डेव्हलपमेंट स्टडीज (CWDS) या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा. त्यांचे ‘मेमॉयर्स ऑफ अ रोलिंग स्टोन’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ३० मे २०१३ - नवी दिल्ली)
(Image Credit: Wikipedia)
राजा गोसावी – अभिनेता
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)
मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक
(मृत्यू: १८ जून १९३६)
शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख – नामवंत अर्थतज्ज्ञ आणि लेखक
आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू
(जन्म: ? ? ????)
ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १४ आक्टोबर १८९०)
व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका
(जन्म: २५ जानेवारी १८८२)
गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू
(जन्म: ३१ मार्च १५०४)
This page was last modified on 23 August 2021 at 2:41pm