इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.
किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
‘ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना झाली.
(Image Credit: Jagran Josh)
सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.
रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
सरदार खाजगीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय.
हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.
रविंद्र रामनारायण ऊर्फ ‘रॉबिन’ सिंग – अष्ट्पैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक
डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते, मराठीतील पहिले सुपरस्टार, हे शिक्षणाने दंतवैद्य (Dentist) होते. तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू, गुंतता हृदय हे, आनंदी गोपाळ इ. नाटके तर मराठा तितुका मेळवावा, पाठलाग, दादी माँ (हिंदी), मधुचंद्र, एकटी, प्रीत शिकवा मला, देवमाणूस, गारंबीचा बापू, अजब तुझे सरकार, झेप, घर गंगेच्या काठी, हा खेळ सावल्यांचा, चंद्र होता साक्षीला हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
(मृत्यू: २ मार्च १९८६ - अमरावती)
(Image Credit: Wikipedia)
राम जेठमलानी – केन्द्रीय कायदामंत्री, कायदेपंडीत व निष्णात वकील, दोन वेळा लोकसभा खासदार (वायव्य मुंबई), पाच वेळा राज्यसभा खासदार, वयाच्या १७ व्या वर्षीच ते एल. एल. बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
(मृत्यू: ८ सप्टेंबर २०१९ - नवी दिल्ली)
(Image Credit: BBC News)
यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत
(मृत्यू: ? ? ????)
पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
विष्णू नरसिंह तथा विष्णुबुवा जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक
(मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)
(Image Credit: दैनिक प्रहार)
योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
(मृत्यू: २९ जुलै १७८१)
रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक, १९७० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते
(जन्म: ५ जून १९५० - लातूर)
(Image Credit: GODL-India)
प्रा. राम जोशी – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ? ? ????)
अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांची एका वेडसर इसमाने गोळ्या घालून हत्या केली.
(जन्म: २९ जानेवारी १८४३)
(Image Credit: The White House)
पोप स्टीफन (पाचवा)
(जन्म: ? ? ????)
This page was last modified on 13 September 2021 at 7:52pm