-: दिनविशेष :-

८ नोव्हेंबर

एखाद्या व्यक्तीचे नाव जाहीर करायचे नसेल तर आपण तिला ‘क्ष’ व्यक्ती म्हणतो. थोडक्यात क्ष म्हणजे माहीत नसलेले. १८९५ मधे विल्हेम राँटजेन याने विशिष्ट किरणांचा शोध लावला. मात्र त्यांचे निश्चित स्वरुप माहित नसल्याने त्याने त्या किरणांना ‘क्ष किरण’ असे नाव दिले. आता या किरणांबद्दल सर्व माहिती असुनही हे किरण ‘क्ष किरण’ म्हणूनच ओळखले जातात.

महत्त्वाच्या घटना:

२००२

गोपाळ बल्लभ तथा जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[कार्यकाल: ८ नोव्हेंबर २००२ ते १८ डिसेंबर २००२ (४० दिवस)]

१९९६

कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ‘ग्रेस’ यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड

१९६०

अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९३९

म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

१८९५

दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

१८८९

मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७६

ब्रेट ली – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१९२७

जयवंत पाठारे

जयवंत पाठारे – ‘आह’, ‘अनाडी’, ‘अनुराधा’, ‘छाया’, ‘सत्यकाम’, ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘गोलमाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer)
(मृत्यू: ९ ऑक्टोबर १९९८)

(Image Credit: NETTV4U)

१९२१

लालकृष्ण अडवाणी – भारताचे ७ वे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते

१९१९

पु. ल. देशपांडे तथा ‘पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते
(मृत्यू: १२ जून २००० - पुणे)

१९१७

कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, देशातील कर्करोग संशोधनाची सुरुवात करण्याचे श्रेय डॉ. व्ही. आर. खानोलकर व डॉ. कमल रणदिवे यांना दिले जाते.
(मृत्यू: ११ एप्रिल २०००)

१९०९

नरुभाऊ लिमये

नरहर वामन तथा ‘नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)

१८९३

प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) – थायलँडचा राजा
(मृत्यू: ३० मे १९४१)

१६५६

एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १४ जानेवारी १७४२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६७४

जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी
(जन्म: ९ डिसेंबर १६०८)

१२२६

लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: ५ सप्टेंबर ११८७)



Pageviews

This page was last modified on 08 October 2021 at 11:14pm