-: दिनविशेष :-

१५ जानेवारी

भारतीय सशस्त्र सेना दिवस


महत्त्वाच्या घटना:

२००१

सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ‘विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

१९९६

भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

१९७३

जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर (डोग्रा रेजिमेंट) यांनी स्वतंत्र भारताचे ८ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली.
(कार्यकाल: १६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५)

१९७०

मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.

१९४९

जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

१८८९

द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या ‘द कोका कोला कंपनी’ म्हणून प्रसिद्ध आहे.

१८६१

एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१७६१

पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१५५९

राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२९

मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ४ एप्रिल १९६८)

१९२३

चित्तरंजन कोल्हटकर

चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते
(मृत्यू: २५ आक्टोबर २००९)

(Image Credit: IMDb)

१९२६

कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]
(मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)

१९२१

बाबासाहेब भोसले

बाबासाहेब अनंतराव भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री
[कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३]
(मृत्यू: ६ आक्टोबर २००७)

(Image Credit: Vethi)

१९२१

सज्जन

सज्जनलाल पुरोहित ऊर्फ ‘सज्जन’ – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते, कवी व गीतलेखक. काबूलीवाला (१९६१), दूर गगन की छाँव में (१९६४), सावन की घटा (१९६६), दिल दिया दर्द लिया (१९६६), राम और शाम (१९६७), फर्ज़ (१९६७), तलाश (१९६९), प्रेम पुजारी (१९७०), जॉनी मेरा नाम (१९७०), पगला कहीं का (१९७०), दुश्मन (१९७१), राजा जानी (१९७१), जहरीला इंसान (१९७४), दस नंबरी (१९७६), ईमान धरम (१९७७), दो और दो पाँच (१९८०), दोस्ताना (१९८०), कालिया (१९८१) इ. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. विक्रम और बेताल या मालिकेत त्यांनी केलेल्या बेतालच्या भूमिकेला विशेष प्रसिद्धी मिळाली.
(मृत्यू: १७ मे २०००)

(Image Credit: Wikipedia)

१९२०

डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)

१७७९

रॉबर्ट ग्रँट – (तत्कालीन) मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड स्टेशन (सद्ध्याचे नाव गावदेवी) हे त्यांच्याच नावाने ओळखले जात असे.
(मृत्यू: ? ? १८३८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१४

नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक
(जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

२०१३

डॉ. शरदचंद्र गोखले

डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक, ‘केसरी’चे संपादक, युनायटेड नेशन्स, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर अनेक जागतिक पातळीवरील संघटनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
(जन्म: २९ सप्टेंबर १९२५)

(Image Credit: Social Work Foot Prints)

२००२

विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत
(जन्म: ? ? १९३५)

१९९८

गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते
(जन्म: ४ जुलै १८९८)

१९९४

हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी
(जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९७१

दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार
(जन्म: ३० मे १९१६)



Pageviews

This page was last modified on 24 October 2021 at 11:34pm