देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ‘ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान
केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ‘अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना
मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र जी. आय. पी. हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली.
लारा दत्ता – मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)
कोंचिता मार्टिनेझ – स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू
सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री, रेल्वे राज्यमंत्री व भाजपचे नेते
चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट’ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले
होते. ‘कीड ऑटो रेसेस अॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले.
(मृत्यू: २५ डिसेंबर १९७७)
विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते
(मृत्यू: ३० मे १९१२)
दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, शाहू महाराजांचे चरित्रकार
(जन्म: ? ? १९३०)
रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध
(जन्म: ? ? ????)
जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले.
(जन्म: ३ डिसेंबर १८८२)
मेरी तूसाँ – ‘मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका
(जन्म: १ डिसेंबर १७६१)
जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ
(जन्म: ८ फेब्रुवारी १६७७)
This page was last modified on 06 June 2021 at 6:58pm