-: दिनविशेष :-

१९ डिसेंबर

गोवा मुक्ती दिन


महत्त्वाच्या घटना:

२००२

व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८३

फिफा वर्ल्ड कप

ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ‘फिफा वर्ल्ड कप’ [Jules Rimet Trophy] (दुसऱ्यांदा) चोरीला गेला. सलग तीनदा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे हा कप १९७० पासून ब्राझीलमध्येच होता. याआधी १९६६ च्या विश्वकप फुटबॉल स्पर्धाच्या आधी हा कप इंग्लंड मधून चोरीला गेला होता. त्यावेळी तो ‘पिकल्स’ नावाच्या एका कुत्र्याने शोधून काढला होता.

(Image Credit: FIFA)

१९६३

झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

१९६१

पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

१९४१

दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.

१९२७

राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७४

रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज

१९३४

प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती

१९१९

ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ‘ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)

१९०६

लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
(मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)

१८९९

मार्टिन ल्यूथर किंग सिनिअर (डॅडी किंग) – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
(मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)

१८९४

कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
(मृत्यू: २० जानेवारी १९८०)

१८५२

अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: ९ मे १९३१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(जन्म: २४ मे १९३३)

१९९८

जनार्दन विठ्ठल (लक्ष्मण) तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक
(जन्म: ? ? १९०५)

१९९७

डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
(जन्म: २० जुलै १९१९)

१९२७

राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक
(जन्म: ११ जून १८९७)

१९१५

अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ
(जन्म: १४ जून १८६४)

१८६०

लॉर्ड (जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे) डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला.
(जन्म: २२ एप्रिल १८१२)

१८४८

एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका
(जन्म: ३० जुलै १८१८)Pageviews

This page was last modified on 09 May 2021 at 10:54pm