-: दिनविशेष :-

१७ ऑगस्ट


महत्त्वाच्या घटना:

१९९७

उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ‘नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर

१९८२

पहिली सी. डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.

१९८८

पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.

१९५३

नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.

१८३६

ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने, जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा ‘रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अ‍ॅक्ट’ अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

१६६६

आग्र्याहून सुटका – शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतुन पसार झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२

हबीब उल बशर – बांगला देशचा क्रिकेटपटू

१९७०

जिम कुरिअर

जिम कुरिअर – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

(Image Credit: Alchetron)

१९४९

निनाद गंगाधर बेडेकर – इतिहास संशोधक, लेखक आणि वक्ते
(मृत्यू: १० मे २०१५)

१९३२

व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक
(मृत्यू: ११ ऑगस्ट २०१८)

१९२६

जिआंग झिमिन – चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चे मुख्य सचिव

१९१६

डॉ. विनायक विश्वनाथ तथा ‘अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ‘ज्ञानप्रबोधिनी’चे संस्थापक
(मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)

१९०५

शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार
(मृत्यू: १० डिसेंबर १९६४)

१८९३

मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)

१८८८

गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक (१९१८), पुण्याचे महापौर (१९६२)
(मृत्यू: ? ? ????)

१८६६

मीर महबूब अली खान – हैदराबादचा सहावा निजाम
(मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)

१७६१

पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक
(मृत्यू: ९ जून १८३४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२०

पं. जसराज – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
(जन्म: २८ जानेवारी १९३०)

१९८८

मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १२ ऑगस्ट १९२४)

१९०९

भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.
(जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)Pageviews

This page was last modified on 09 June 2021 at 11:18pm