टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण झाले. ही जगातील सर्वात स्वस्त कार होती. मात्र पहिल्या काही ग्राहकांनाच एक लाख रुपयांत गाडी मिळाली. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ व इतर काही समस्यांमुळे एक लाख रुपयांत गाडी देणे कंपनीला शक्य झाले नाही. अखेर मागणीअभावी २०१८ मध्ये उत्पादन बंद करण्यात आले.
(Image Credit: Car Magazine)
ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
पुण्यातील शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. रु. १,०००/- च्या नोटा आत्तापर्यंत तीन वेळा चलनातून रद्द करण्यात आल्या आहेत.
(Image Credit: india.com)
पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न
(Image Credit: What’s Hot)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण
अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
संभाजी राजे यांचा ‘छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.
नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव फसला
रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: २९ जानेवारी १९९५)
कबीर बेदी – चित्रपट अभिनेते
ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार
(मृत्यू: २८ जानेवारी २००७)
नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ‘नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
(मृत्यू: ११ डिसेंबर २००२)
आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती
(मृत्यू: ४ एप्रिल १९३१)
श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ‘पेटीवाले’ मेहेंदळे
(जन्म: ? ? ????)
रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक
(जन्म: ? ? ????)
त्रिलोकीनाथ कौल – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत
(जन्म: ? ? १९१३ - बारामुल्ला, जम्मू काश्मीर)
कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या
(जन्म: ? ? १९३३)
डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत
(जन्म: २२ नोव्हेंबर १९१३
- भागलपूर, बिहार)
रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(जन्म: २० डिसेंबर १९०१)
साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ
(जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ‘कलामहर्षी’
(जन्म: ३ जून १८९०)
शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक. त्यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर (विविध भाषांत) १६ चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु. बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ‘भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे.
(जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
(Image Credit: Banglapedia)
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश
(जन्म: १८ जानेवारी १८४२)
This page was last modified on 15 September 2021 at 3:10pm