-: दिनविशेष :-

२ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९९९

दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

१९४०

दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

१९१४

रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६५

शाहरुख खान

शाहरुख खान – अभिनेता व निर्माता

(Image Credit: The Indian Express)

१९६०

अनू मलिक

अन्वर सरदार मलिक तथा अनू आदित्य मलिक उर्फ ‘अनू’ मलिक – संगीतकार, संगीत दिग्दर्शक, संगीत संयोजक व गायक

(Image Credit: Cinestaan)

१९४१

अरुण शौरी

अरुण शौरी – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, लेखक, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे सल्लागार

(Image Credit: The Quint)

१९२१

रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ, हिन्दी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले.
(मृत्यू: ? ? ????)

१८९७

सोहराब मोदी

सोहराब मेहेरबानजी मोदी – भारतातील चित्रपट निर्मितीचे आद्यप्रवर्तक, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ‘मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले.
(मृत्यू: २८ जानेवारी १९८४)

(Image Credit:  @cinemaazi)

१८८६

धीरेंद्रनाथ दत्ता

धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी
(मृत्यू: २९ मार्च १९७१)

(Image Credit: Dhaka Tribune)

१८८२

डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य
(मृत्यू: २ मे १९६३)

१८३३

महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ‘इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे ‘जर्नल ऑफ मेडिसीन’ हे मासिक सुरू केले.
(मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१७५५

मेरी आंत्वानेत

मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी
(मृत्यू: १६ आक्टोबर १७९३)

(Image Credit: Smithsonian Magazine)

१४७०

एडवर्ड (पाचवा)

एडवर्ड (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ९ एप्रिल १४८३)

(Image Credit: royal.uk)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
(जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

१९९०

भालचंद्र दिगंबर तथा ‘आबासाहेब’ गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक
(जन्म: २१ डिसेंबर १९०३)

१९८४

शरद्चंद्र मुक्तिबोध – मराठी साहित्यिक
(जन्म: ? ? ????)

१९५०

जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक
(जन्म: २६ जुलै १८५६)

१८८५

बळवंत पांडुरंग तथा ‘अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार
(जन्म: ३१ मार्च १८४३)Pageviews

This page was last modified on 02 November 2021 at 3:10pm