-: दिनविशेष :-

२८ जून


महत्त्वाच्या घटना:

१९९८

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.

१९९७

मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.

१९९४

विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.

१९७८

अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

१९७२

दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ

१८४६

अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ‘सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.

१८३८

इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९३७

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे – आंबेडकरवादी साहित्यिक व समीक्षक
(मृत्यू: २७ मार्च २०१८ - औरंगाबाद)

१९३४

रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू
(मृत्यू: १८ जुलै २००१)

१९२८

बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक
(मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

१९२१

नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री
(मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

१७१२

रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार
(मृत्यू: २ जुलै १७७८)

१४९१

हेन्‍री (आठवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०००

विष्णू महेश्वर ऊर्फ ‘व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)

१९९९

रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार
(जन्म: ? ? ????)

१९८७

पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक
(जन्म: ३० जानेवारी १९११)

१९७२

प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक
(जन्म: २९ जून १८९३)

१८३६

जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १६ मार्च १७५१)Pageviews

This page was last modified on 25 August 2021 at 2:34pm