-: दिनविशेष :-

२७ जुलै


महत्त्वाच्या घटना:

२०१२

लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

२००१

सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय

१९९९

द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.

१९९७

तामिळनाडुचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

१९८३

कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

१९५५

दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

१९२१

रक्तातील साखरेवर ‘इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ‘इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.

१८९०

डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

१७६१

माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ‘थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

अ‍ॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९११

डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१)
(मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

१६६७

योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ
(मृत्यू: १ जानेवारी १७४८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१५

ए. पी. जे. अब्दुल कलाम
२०१५ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ‘भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत. याआधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ. झाकिर हुसेन (१९६३) या भारतरत्‍न मिळालेल्या व्यक्ति पुढे राष्ट्रपती झाल्या.
(जन्म: १५ ऑक्टोबर १९३१ - रामेश्वरम, तामिळनाडू)

(Image Credit: Wikipedia)

२००७

वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ
(जन्म: ३० जानेवारी १९१७)

२००२

कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती
(जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

१९९७

बळवंत लक्ष्मण वष्ट – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते

१९९२

अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
(जन्म: १२ नोव्हेंबर १९४० - गझनी, अफगाणिस्तान)

१९८७

डॉ. सालिम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक
(जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)

१९८०

मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण
(जन्म: २६ आक्टोबर १९१९)

१९७५

त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.
(जन्म: ? ? ????)

१८९५

उस्ताद बंदे अली खाँ – बीनकार, किराणा घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन करणारे असा त्यांचा लौकिक होता. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे.
(जन्म: ? ? ????)

१८४४

जॉन डाल्टन

जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

(Image Credit: Wikipedia)



Pageviews

This page was last modified on 14 October 2021 at 11:10pm