-: दिनविशेष :-

२४ सप्टेंबर

जागतिक कर्णबधिर जागरूकता दिन


महत्त्वाच्या घटना:

२००७

महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली भारताने ‘टी २० विश्वकरंडक’ जिंकला.

१९९९

कैगा अणूशक्ती प्रकल्पातील २२० मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

१९९५

गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ‘मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

१९९४

‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.

१९६०

यू. एस. एस. एंटरप्राइझ
अटलांटिक महासागरात

अणूशक्तीवर चालणार्‍या ‘यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले. १ डिसेंबर २०१२ रोजी ही नौका सेवानिवृत्त करण्यात आली.

(Image Credit: विकिपीडिया)

१९४८

होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना.

१९४६

??

हाँगकाँग येथे ‘कॅथे पॅसिफिक एअरवेज’ची स्थापना झाली.

१९३२

दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ‘पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५०

मोहिंदर अमरनाथ – क्रिकेटपटू आणि समालोचक

१९४०

आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू
(मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)

१९२४

गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष
(मृत्यू: ३१ मार्च २००४)

१९२२

असित सेन हिंदी व बंगालीतील अभिनेते, दिग्दर्शक, पटकथालेखक व छायालेखक
(मृत्यू: २५ ऑगस्ट २००१)

१९२२

गजानन वासुदेव तथा ‘ग. वा.’ बेहेरे – ‘सोबत’ साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक
(मृत्यू: ३० मार्च १९८९)

१९२१

डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ‘गत शतक शोधताना’ आणि ‘तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. धनंजय कीर यांच्या साहाय्याने त्यांनी ‘महात्मा फुले समग्र वाङ्‍मय’ संपादित केले आहे.
(मृत्यू: ७ जून १९९२)

१९१५

प्रभाकर शंकर मुजूमदार – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत, ‘भारतवर्ष’, ‘भगवानतिलक’, ‘मृच्छकटिक’, ‘वळवाचा पाऊस’, ‘शारदा’ इ. अनेक नाटकांमधे त्यांनी भूमिका केल्या.
(मृत्यू: ? ? ????)

१९११

कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव
(मृत्यू: १० मार्च १९८५)

१८९८

अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)

१८८९

केशवराव दाते

केशवराव त्र्यंबक दाते– चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या.
(मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ - मुंबई)

(Image Credit: Cinestaan)

१८६१

मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला.
(मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

१५५१

पाच लाख ओव्यांची रचना करणारे दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ संत दासोपंत – प्रचंड कवी
(मृत्यू: २८ जानेवारी १६१६)

१५३४

गुरू राम दास

भाई जेठामल सोधी उर्फ गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू. यांनी अमृतसर शहराची स्थापना केली.
(मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)

(Image Credit: medium.com)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

श्रीपाद रघुनाथ जोशी – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक
(जन्म: ? ? ????)

२००२

सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश
(जन्म: २६ एप्रिल १९०८)

१९९८

वासूदेव पाळंदे – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक. पुण्यातील ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ‘महाराष्ट्रीय कलोपासक’, ‘जागर’ इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
(जन्म: ? ? ????)



Pageviews

This page was last modified on 11 September 2021 at 9:49pm