आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवा मुलीचाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.
भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली. गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती.
‘अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
पं. उपेन्द्र भट – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक
डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो.
अॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)
मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ जून १९२०)
शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
(Image Credit: Wikimedia Commons)
सर स्टॅफोर्ड क्रिप्स – मजूर पक्षाचे इंग्लिश राजकारणी, बॅरिस्टर, मुत्सद्दी (जन्म: २४ एप्रिल १८८९)
जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ५ जून १८८३)
(Image Credit: St Faith’s, Cambridge)
सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)
(Image Credit: विकिपीडिया)
हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जानेवारी १४५७)
This page was last modified on 21 April 2021 at 1:29am