९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.
विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार
टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
डॉ. प्रकाश आमटे
लालन सारंग – चित्रपट, रंगभूमी तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री व निर्माती
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१८)
डॉ. मेबल आरोळे – बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या
(मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)
पं. कृष्णा गुंडोपंत तथा ‘के. जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
(मृत्यू: १३ जुलै १९९४)
डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा,
दर्दके पाबंद इ. कादंबर्या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
(मृत्यू: १७ जून १९९१)
डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ‘महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
(मृत्यू: ३ जानेवारी २०००)
माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते
(मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६)
(Image Credit: Getty Images)
चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक
(मृत्यू: १८ आक्टोबर १८७१)
(Image Credit: Britannica / Wellcome Library)
कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते
(जन्म: १५ सप्टेंबर १९२१)
प्रा. शंकर गोविंद साठे – कवी, कथालेखक आणि नाटककार. त्यांच्या ‘ससा आणि कासव’ या नाटकावरून सई परांजपे यांनी ‘कथा’ या नावाचा चित्रपट काढला होता.
(जन्म: ११ मार्च १९१२)
शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
(जन्म: १९ ऑगस्ट १९१८)
केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ‘चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ‘शंकर्स
इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
(जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)
हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ८ मे १८८४)
(Image Credit: विकिपीडिया)
बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक
(जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)
This page was last modified on 25 December 2021 at 5:49pm