-: दिनविशेष :-

१३ जुलै


महत्त्वाच्या घटना:

२०११

मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.

१९७७

रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.

१९५५

२८ वर्षीय रुथ एलीसला (Ruth Ellis) प्रियकराचा खून केल्याबद्दल फासावर चढविण्यात आले. हॉलो वे तुरूंगातली ही फाशी ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

१९२९

जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.

१९०८

लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.

१८६३

सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

१८३७

बकिंगहॅम पॅलेस

राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

(Image Credit: Harpar’s Bazar)

१६६०

बाजी प्रभू देशपांडे
पन्हाळगडावरील पुतळा

पावनखिंड झुंजवणार्‍या वीर बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज ऐकल्यावर ‘आता मी सुखाने मरतो’ असे म्हणून प्राण सोडला.

(Image Credit: Wikipedia)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४२

हॅरिसन फोर्ड

हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता

(Image Credit: Deadline)

१८९२

केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१०

मनोहारी सिंग

मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक
(जन्म: ८ मार्च १९३१)

(Image Credit: Rewind)

२००९

निळू फुले – अभिनेते
(जन्म: ? ? १९३०)

२०००

इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका
(जन्म: ४ जानेवारी १९१४)

१९९४

पं. कृष्णा गुंडोपंत तथा ‘के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक
(जन्म: २६ डिसेंबर १९२५)

१९९०

अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ‘बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक
(जन्म: ? ? १८९७)

१९६९

महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.
(जन्म: १२ जानेवारी १९०२)

१९१९

गणेश जनार्दन आगाशे – नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार, उत्तम वक्ते व इंदूर येथे १९१७ मध्ये झालेल्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(जन्म: १३ सप्टेंबर १८५२)Pageviews

This page was last modified on 14 August 2021 at 11:25pm