-: दिनविशेष :-

१८ आक्टोबर

जागतिक रजोनिवृत्ती दिन


महत्त्वाच्या घटना:

२००२

कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.

१९२२

BBC Logo

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना

(Image Credit: Wikipedia)

१९१९

राम गणेश गडकरी लिखित ‘संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.

१९०६

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.

१८७९

थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना

१८६७

अलास्का
क्षेत्रफळ: १७, १७, ८५६ चौ. किमी.

सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.

(Image Credit: World Atlas)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६

मार्टिना नवरातिलोव्हा
१९८० मधील छायाचित्र

मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू

(Image Credit: Sports Illustrated)

१९२५

इब्राहिम अल्काझी

इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (NSD) संचालक (१९६२-१९७७), पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (१९९१), पद्मविभूषण (२०१०) या पुरस्कारांनी सन्मानित, त्यांनी तुघलक (गिरीश कर्नाड), आषाढ का एक दिन (मोहन राकेश), अंधा युग (धर्मवीर भारती) इ. ५० हुन अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. विजया मेहता, ओम शिवपुरी, ओम पुरी, नासिरुद्दीन शाह, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी हे त्यांचे काही नामांकित शिष्य होत.
(मृत्यू: ४ ऑगस्ट २०२०)

(Image Credit: Wikipedia)

१८६१

चिंतामणराव वैद्य

‘भारताचार्य’ चिंतामणराव विनायक वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार’ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य’ ही पदवी दिली. १८८९ ते १९३४ या काळात वैद्यांनी सुमारे ५०,००० पृष्ठे इतके विपुल लेखन इंग्रजी-मराठीत केले.
(मृत्यू: २० एप्रिल १९३८)

(Image Credit: मराठी विश्वकोश)

१८०४

मोंगकुट ऊर्फ राम (चौथा)

मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा
(मृत्यू: १ आक्टोबर १८६८)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४

वीरप्पन

कुसे मुनीस्वामी वीरप्पन – चंदन व हस्तिदंत तस्कर. आपल्या ४० वर्षांच्या ‘कारकिर्दीत’ खंडणीसाठी त्याने अनेक राजकीय नेत्यांचे अपहरण केले. ९७ पोलीस आणि वनाधिकाऱ्यांसह सुमारे १८४ व्यक्ती आणि ९०० हत्तींच्या हत्येस तो कारणीभूत आहे. मात्र मानवतेवर अगाध विश्वास असणारी वीरप्पनची मुलगी विद्या वीरप्पन ही प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित झाली आहे आणि ती सध्या तामिळनाडू भाजपाची कार्यकर्ती आहे!
(जन्म: १८ जानेवारी १९५२)

(Image Credit: Wikipedia)

१९९५

ई. महमद – छायालेखक (शेजारी, दहा वाजता, आसमान, चोरीचा मामला)
(जन्म: ? ? ????)

१९९३

मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत. त्यांनी फाळके यांच्या ‘कालियामर्दन’ या मूकपटात काम केले होते.
(जन्म: ? ? ????)

१९८७

वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते. कार्ल मार्क्सच्या ‘दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला.
(जन्म: ? ? ????)

१९८३

विजय मांजरेकर

विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
(जन्म: २६ सप्टेंबर १९३१)

(Image Credit:  @ICC)

१९५१

हिराबाई पेडणेकर – नाटककार, गायिका, संगीतकार
(जन्म: २२ नोव्हेंबर १८८५)

१९३१

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
(जन्म: ११ फेब्रुवारी १८४७)

(Image Credit: Wikipedia)

१९०९

बॅरिस्टर लालमोहन घोष

बॅरिस्टर लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे सहसंस्थापक आणि १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. १८८५ मध्ये त्यांनी लंडनच्या डेप्टफोर्ड (लंडन) मतदारसंघातून लिबरल पार्टीच्या तिकिटावर ब्रिटिश संसदेची निवडणूक लढवली आणि ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत उमेदवार असलेले पहिले भारतीय बनले.
(जन्म: १७ डिसेंबर १८४९ - कलकत्ता)

१८७१

चार्ल्स बॅबेज

चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक
(जन्म: २६ डिसेंबर १७९१)

(Image Credit: Britannica / Wellcome Library)Pageviews

This page was last modified on 25 December 2021 at 5:41pm