-: दिनविशेष :-

९ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

२०००

उत्तराखंड उच्‍च न्यायालय

उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना

(Image Credit: Times of India)

२०००

न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

१९६५

इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला. अमेरिकेत असे प्रसंग कमी असल्यामुळे त्याला बातमीचे स्वरूप आले.

१९६०

रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. ‘फोर्ड’ आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.

१९५३

कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४७

भारत सरकारने गुजरातेतील जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

१९३७

जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९०६

आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८०

पायल रोहतगी – अभिनेत्री व मॉडेल

१९३४

कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला.
(मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)

१९३१

एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत
(मृत्यू: ६ आक्टोबर २००७)

१९२४

पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार
(मृत्यू: १० जानेवारी २००२)

१९०४

पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ
(मृत्यू: १८ मे १९६६)

१८७७

सर मुहम्मद इक्‍बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते
(मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१८

लालन सारंग – चित्रपट, रंगभूमी तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री व निर्माती
(जन्म: २६ डिसेंबर १९३८)

२०११

हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: ९ जानेवारी १९२२)

२००५

के. आर. नारायणन
२००० मधील छायाचित्र

के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती आणि ९ वे उपराष्ट्रपती
(जन्म: २७ आक्टोबर १९२०)

(Image Credit: Wikipedia)

१९७७

केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक. ‘अमृतमंथन’, ‘संत तुकाराम’, ‘ कुंकू’, ‘माझा मुलगा’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘संत सखू’ आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी ‘वसुंधरा’ या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत.
(जन्म: २३ मे १८९६)

१९७०

चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती
(जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)

१९६७

बाबूराव पेंढारकर

दामोदर गोपाळ तथा नटवर्य बाबूराव पेंढारकर – मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते, इ.स. १९२० साली त्यांनी ‘सैरंध्री’ या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२०च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. रंगभुमीवरील ‘झुंजारराव’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली. ते भालजी पेंढारकरांचे मोठे भाऊ व मास्टर विनायक यांचे सावत्र भाऊ होत.
(जन्म: २२ जून १८९६)

(Image Credit: Cinestaan)

१९६२

महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न
(जन्म: १८ एप्रिल १८५८)

१९५२

चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)

१९४०

नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान
(जन्म: १८ मार्च १८६९)Pageviews

This page was last modified on 26 October 2021 at 3:24pm