-: दिनविशेष :-

९ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

२००३

संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

१९७३

बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

१९६९

बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

१९५१

स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू झाली.

१९३३

साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्यामची आई‘ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९००

लॉन टेनिस या खेळातील ‘डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१९२२

जिम लेकर

जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)

(Image Credit: espncricinfo.com)

१९१७

होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार
(मृत्यू: २७ जून १९९८)

१८७४

स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली.
>(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ - नाशिक)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८

डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
(जन्म: २६ डिसेंबर १९१४)

२०००

शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती
(जन्म: १७ नोव्हेंबर १९१६)

१९८४

तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका
(जन्म: १३ मे १९१८)

१९८१

एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री
(जन्म: ३० सप्टेंबर १९००)

१९७९

राजा परांजपे

राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
(जन्म: २४ एप्रिल १९१०)

(Image Credit: विकिपीडिया)

१९६६

दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली.
(जन्म: ? ? ????)

१८७१

फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ
(जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)



Pageviews

This page was last modified on 23 April 2021 at 11:10pm