-: दिनविशेष :-

२७ डिसेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९७५

बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले. यश चोप्रा यांनी या दुर्घटनेवर आधारित ‘काला पत्थर’ हा चित्रपट काढला आहे.

१९४९

इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९४५

ब्रेटन वूड्स, न्यू हॅम्पशायर येथे झालेल्या परिषदेत ४४ देशांतील ७३० प्रतिनिधींनी केलेल्या करारानुसार, जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.

१९११

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ‘जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४४

विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
(मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)

१९०४

वसंत शांताराम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या ‘प्रेमसंन्यास’ या नाटकासाठी पदे लिहिली आहेत. विधिलिखित, अमृतसिद्धी (नाटके), मखमलीचा पडदा, नट-नाटक आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा), बालगंधर्व-व्यक्ती व कला, महात्मा जोतीराव फुले (चरित्र), रागरंग, विश्रब्ध शारदा- २ खंड इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.
(मृत्यू: २३जून १९९४)

१८९८

डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.
(मृत्यू: १० एप्रिल १९६५)

१८२२

लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ. रोगांवर लसीकरण करण्याची पद्धत तसेच दूध विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ते निर्जंतुक करण्याची पद्धत (पाश्चरायझेशन) याचा त्याने शोध लावला.
(मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)

१७९७

मिर्झा असादुल्ला बेग खान गालिब ऊर्फ मिर्झा गालिब – उर्दू शायर
(मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)

१६५४

जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ
(मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)

१५७१

योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
(मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००७

पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या
(जन्म: २१ जून १९५३)

१९७२

लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: २३ एप्रिल १८९७)

१९२३

गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता
(जन्म: १५ डिसेंबर १८३२)



Pageviews

This page was last modified on 30 May 2021 at 6:24pm