-: दिनविशेष :-

८ मे

जागतिक रेड क्रॉस दिन

जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन


महत्त्वाच्या घटना:

१९७४

रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.

१९४५

दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त

१९३३

महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९३२

पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालयाची शाखा सुरु केली. या महाविद्यालयाची स्थापना लाहोर येथे ५ मे १९०१ रोजी पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी केली होती.

१९१२

पॅरामाउंट पिक्चर्स
First Logo

‘पॅरामाउंट पिक्चर्स’ (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.

(Image Credit: विकिपीडिया)

१८९९

क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी

१८८६

जॉन पेंबरटनने ‘कोका कोला’ हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

मायकेल बेव्हन

मायकेल बेव्हन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, डावखुरा फलंदाज आणि मंदगती फिरकी गोलंदाज. २३२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत ५३.५८ च्या सरासरीने त्याने ६९१२ धावा काढल्या. १०८* सर्वोच्च धावसंख्या.

(Image Credit:  @ICC)

१९२६

डेव्हिड अटेनबरो
२०१५ मधील छायाचित्र

सर डेव्हिड फ्रेडरिक अटेनबरो – सजीवसृष्टी, प्राणिजीवन, जैवविविधता, नैसर्गिक साधनसामग्री यावर माहितीपट बनवून सादर करणारे बी. बी. सी. व इतर अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील सादरकर्ते

(Image Credit: विकिपीडिया)

१९१६

स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू
(मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)

१८८४

हॅरी ट्रूमन
Official Portrait : 1947

हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २६ डिसेंबर १९७२)

(Image Credit: विकिपीडिया)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३

झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक
(जन्म: १५ जून १९३२)

२००३

डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान
(जन्म: १० ऑगस्ट १९१३)

१९९९

श्रीकृष्ण समेळ – कलादिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)

१९९५

प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी
(जन्म: ११ ऑगस्ट १९११)

१९९५

जि. भि. दीक्षित – देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार

१९८२

कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे तथा ‘कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, मालवण येथे १९५८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष. ‘प्रेम आणि जीवन’, ‘भग्नमूर्ती’, ‘चिनी मुलास’, ‘निर्वासित’ ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले आहे.
(जन्म: ११ सप्टेंबर १९०१ - (मूर्तिजापूर, अकोला)

(Image Credit: आठवणीतली गाणी)

१९८१

डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृततज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
(जन्म: १९ एप्रिल १८९५)

१९७२

पांडुरंग वामन तथा पां. वा. काणे – भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, संस्कृत पंडित, महामहोपाध्याय, विख्यात कायदेपंडित, भारतरत्‍न (१९६३)
(जन्म: ७ मे १८८०)

१७९४

अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये

अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक, मानवतावादी समाजसुधारक. याला देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल देहदंड देण्यात आला.
(जन्म: २६ ऑगस्ट १७४३)

(Image Credit: Scientists of World)Pageviews

This page was last modified on 08 May 2022 at 1:16pm