शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान
शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे ‘सेल्फ पोर्ट्रेट विदाउट बेअर्ड’ हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले. हे त्यांनी काढलेले शेवटचे सेल्फ पोर्ट्रेट असावे असा अंदाज आहे.
(Image Credit: Wikipedia)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
फूटबॉलपटू पेलेने आपला (कथित) १,००० वा गोल केला.
‘अपोलो-१२’ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४
झीनत अमान – अभिनेत्री, मिस एशिया-पॅसिफिक-१९७०
दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
(मृत्यू: १२ जुलै २०१२)
सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार
(मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ - मुंबई)
(Image Credit: Wikipedia)
इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्या पंतप्रधान
(मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)
(Image Credit: Wikipedia)
एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे.
(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)
पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
(मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)
सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक. अहिल्या आणि इतर कथा, घारापुरी (१९४८), संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश, सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत.
(मृत्यू: २९ जानेवारी १९६३)
जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू
(मृत्यू: ८ मार्च १९४२)
देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक, प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ, विदीशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खांब बाबा पिलर’ हा स्तंभ हे त्यांचे एक प्रमुख संशोधन
(मृत्यू: १३ मे १९५०)
केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक
(मृत्यू: ८ जानेवारी १८८४)
जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)
मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी
(मृत्यू: १८ जून १८५८)
याना नोव्होत्ना – झेक लॉन टेनिस खेळाडू, १९९८ ची विम्बल्डन विजेती
(जन्म: १ ऑक्टोबर १९६८)
(Image Credit: The Scotsman)
रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक
(जन्म: ????)
कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्या डासांवर अभ्यास करुन त्यांनी ‘डास तो काय?’ अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती.
(जन्म: ? ? ????)
This page was last modified on 31 October 2021 at 12:02am