लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
मेम्फिस, टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली.
‘नासा’ने ‘अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले.
पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ‘नाटो’ची (NATO) स्थापना केली.
दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
रामचंद्र गंगाराम तथा ‘बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज
(मृत्यू: १७ जानेवारी २०२० - मुंबई)
पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
(मृत्यू: १ एप्रिल १९८४)
सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ‘सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे.
(मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३)
वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर – कलादिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)
आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक
(जन्म: ५ जुलै १९२०)
सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ‘अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार
(जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)
पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी
(जन्म: ५ जानेवारी १९२८)
मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: १५ जानेवारी १९२९)
आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती
(जन्म: १६ जानेवारी १८५३)
जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ
(जन्म: ४ ऑगस्ट १८३४)
जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक
(जन्म: ? ? १५५०)
This page was last modified on 02 October 2021 at 10:45pm