-: दिनविशेष :-

२९ जानेवारी


महत्त्वाच्या घटना:

१९८९

हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

१९७५

इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

१८८६

कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

१८६१

कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

१७८०

जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ‘कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ‘हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज, केंद्रीय मंत्री

१९५१

अँडी रॉबर्टस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज

१९२६

डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम
(मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ - ऑक्सफर्ड, इंग्लंड)

१९२२

प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ‘रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक
(मृत्यू: १४ जुलै २००३)

१८६६

रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)

१८६०

अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.
(मृत्यू: १५ जुलै १९०४)

१८५३

मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली, त्यांपैकी एका कुटुंबात जन्म.
(मृत्यू: ? ? १९१२)

१८४३

विल्यम मॅक किनले – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)

१७३७

थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक
(मृत्यू: ८ जून १८०९)

१२७४

संत निवृत्तीनाथ
(मृत्यू: १७ जून १२९७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

राम मेघे – महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री
(जन्म: ? ? ????)

२०००

देवेन्द्र मुर्डेश्वर – बासरीवादक
(जन्म: १९ सप्टेंबर १९२३)

२०००

पांडुरंग सावळाराम तथा काका वडके – शिवसेना नेते
(जन्म: ? ? ????)

१९९५

रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: १६ जानेवारी १९४६)

१९९३

रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ
(जन्म: ? ? ????)

१९६३

सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक. अहिल्या आणि इतर कथा, घारापुरी (१९४८), संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश, सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत.
(जन्म: १९ नोव्हेंबर १८९७)

१९६३

रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी
(जन्म: २६ मार्च १८७४)

१९३४

फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
(जन्म: ९ डिसेंबर १८६८ - वॉर्क्लॉ, पोलंड)

१८२०

जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: ४ जून १७३८)

१५९७

महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट
(जन्म: ९ मे १५४०)Pageviews

This page was last modified on 09 May 2021 at 1:42pm