-: दिनविशेष :-

१ आक्टोबर

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

जागतिक शाकाहार दिन

१ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह

महत्त्वाच्या घटना:

२००५

इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.

१९६०

नायजेरियाचा ध्वज

नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

(Image Credit: Britannica)

१९५९

भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५८

भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

१९४६

मेन्सा इंटरनॅशनल

युनायटेड किंग्डममधे ‘मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची स्थापना झाली. जगातील १०० देशांत या संस्थेचे जाळे पसरले असून असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या लोकांसाठी ही संस्था कार्यरत आहे.

(Image Credit: Mensa International)

१९४३

दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.

१८९१

स्टॅनफोर्ड विद्यापीठ

स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली. जगातील १० सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा समावेश होतो.

(Image Credit: Stanford University)

१८८०

थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.

१८३७

भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.

१७९१

राजसत्ता झुगारून देऊन प्रजासत्ताक बनल्यानंतर फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३०

जे. एच. पटेल

जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ आक्टोबर १९९९)
(मृत्यू: १२ डिसेंबर २०००)

(Image Credit: Wikipedia)

१९२८

शिवाजी गणेशन

विझुपुरम चिन्नया मनरायार तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते
(मृत्यू: २१ जुलै २००१)

(Image Credit: Cinestaan)

१९२४

जिमी कार्टर
अधिकृत छायाचित्र (१९७७)

जेम्स अर्ल कार्टर (ज्युनिअर) तथा ‘जिमी’ कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: २० जानेवारी १९७७ ते २० जानेवारी १९८१), नोबेल शांति पुरस्कार विजेते (२००२)

(Image Credit: Wikipedia)

१९१९

ग. दि. माडगूळकर

गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते आणि वक्ते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५७ पटकथा आणि २००० हुन अधिक गीते लिहिली आहेत. गीतरामायणामुळे त्यांना ‘महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९५१), पद्मश्री (१९६९)
(मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)

(Image Credit: Films Division)

१९१९

मजरुह सुलतानपुरी

असरार उल हसन खान उर्फ मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९४) शायर, गीतकार आणि कवी
(मृत्यू: २४ मे २०००)

(Image Credit: rekhta.org)

१९०६

सचिन देव बर्मन
२००७ मध्ये जरी केलेले टपाल तिकीट

सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक
(मृत्यू: ३१ आक्टोबर १९७५)

(Image Credit: Wikipedia)

१८९५

लियाकत अली खान
पत्नी आणि मुलांसमवेत

नवाबझादा ‘कैद-ए-मिल्लत’ लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान
(कार्यकाल: १५ ऑगस्ट १९४७ ते १६ ऑक्टोबर १९५१)
(मृत्यू: १६ आक्टोबर १९५१)

(कैद-ए-मिल्लत = Leader of the Nation)

(Image Credit: Wikipedia)

१८८१

विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक
(मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)

१८४७

अ‍ॅनी बेझंट

अ‍ॅनी वुड तथा अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ‘होमरुल लीग’ची स्थापना केली.
(मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७

गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१")
(जन्म: ?? १९६१)

१९३१

शंकर काशिनाथ गर्गे तथा ‘दिवाकर’ – नाट्यछटाकार
(जन्म: १८ जानेवारी १८८९)

१८६८

मोंगकुट ऊर्फ राम (चौथा)

मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा
(जन्म: १८ आक्टोबर १८०४)

(Image Credit: Wikipedia)



Pageviews

This page was last modified on 17 October 2021 at 1:17pm