उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड ब छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने सायप्रस येथे झालेल्या स्पर्धेत ‘विश्वसुंदरी’ (Miss Universe) हा किताब पटकावला.
(Image Credit: Angelopedia)
ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सोच समझ के’ या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
बोलपटांच्या आरंभीच्या काळापासून असलेल्या नायिका, गायिका, नर्तकी, सहनायिका व नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न
राज्यसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले.
थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
श्री श्री रविशंकर – आध्यात्मिक गुरू
डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक
(मृत्यू: १८ सप्टेंबर २००४)
तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका
(मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८४)
फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा
त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.
(मृत्यू: ११ फेब्रुवारी १९७७)
सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर
(मृत्यू: १६ सप्टेंबर १९३२ - लंडन, यू. के.)
विनायक महादेव तथा ‘वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक
(जन्म: ७ आक्टोबर १९१७ - मणेराजूरी, सांगली)
(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)
रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – प्रतिथयश लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. राज्यसभा सदस्य (१२ मे १९८६ ते ३१ मे १९९२). ‘द गाईड’, ‘सॉरी नो रूम’, ‘द वर्ल्ड ऑफ नागराज’, ‘वेटिंग फॉर महात्मा’ इ. कादंबर्या, तसेच ‘मालगुडी डेज’, ‘ए हॉर्स अँड टू गोट्स’ इ. कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. ‘द गाईड’ ही त्यांची कादंबरी देशातील अनेक विद्यापीठांत बी. ए. (इंग्लिश) च्या अभ्यासक्रमात होती. या कादंबरीवर चित्रपटही निघाला आहे.
(जन्म: १० आक्टोबर १९०६)
(Image Credit: Wikipedia)
देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक, प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ, विदीशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खांब बाबा पिलर’ हा स्तंभ हे त्यांचे एक प्रमुख संशोधन
(जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)
मलिक अंबर – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण. औरंगाबाद शहरातील त्यांनी केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था आजही नहर-ए-अंबरी म्हणून प्रसिद्ध आहे.
(जन्म: ? ? १५४९)
This page was last modified on 09 October 2021 at 9:48pm