जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ‘१८ जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.
फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव झाला.
उदय हुसेन – इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचा मुलगा
(मृत्यू: २२ जुलै २००३)
थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष.
कार्यकाल: १६ जून १९९९ ते २४ सप्टेंबर २००८
पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, ‘बीटल्स’चा सदस्य
के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक
(मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)
कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ
(मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)
शंकर त्रिंबक तथा ‘दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
(मृत्यू: १ डिसेंबर १९८५)
मिल्खा सिंग – ‘द फ्लाइंग सिख’
(जन्म: १४ एप्रिल२० नोव्हेंबर १९२९)
उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप
(जन्म: १४ एप्रिल १९२२ - शिबपूर,
कोमिल्ला, बांगला देश)
जानकीदास मेहरा ऊर्फ जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते, निर्माते आणि पटकथालेखक, १९३६ मध्ये बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य, ८ विश्वविक्रम मोडणारे निष्णात सायकलपटू
(जन्म: १ जानेवारी १९१०)
श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
(जन्म: ८ जुलै १९२८)
सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या लोकसभेतील खासदार (जबलपूर), पद्मभूषण (१९६१)
(जन्म: १६ आक्टोबर १८९६)
(Image Credit: Hindi Jeevan Parichay)
जगन्नाथ रघुनाथ तथा जे. आर. ऊर्फ ‘नानासाहेब’ घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य, नामवंत विद्वान, संस्कृत पंडित. ‘हिंदू लॉ’ या विषयावरचे त्यांचे पुस्तक अत्यंत गाजलेले आहे.
(जन्म: ? ? ????)
डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू
(जन्म: २३ आक्टोबर १९००)
मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक
(जन्म: २८ मार्च १८६८)
सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक
(जन्म: ४ डिसेंबर १८३५)
रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ‘मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ‘विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक
(जन्म: १० एप्रिल १८४३)
मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी - इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या
(जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)
This page was last modified on 15 October 2021 at 7:47pm