-: दिनविशेष :-

१९ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००७

टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

२००१

महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना ‘जमनालाल बजाज पुरस्कार‘ जाहीर

२०००

भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.

१९८३

सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

१९५९

सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील ‘डिस्‍नेलँड’ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

१९४६

फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला. दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे याला ७ वर्षे ऊशीर झाला. (website)

१८९३

न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५८

लकी अली – गायक, अभिनेता व गीतलेखक

१९२५

बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार
(मृत्यू: २८ जुलै १९८१)

१९२३

देवेन्द्र मुर्डेश्वर – बासरीवादक
(मृत्यू: २९ जानेवारी २०००)

१९१७

अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक
(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

१९११

विल्यम गोल्डिंग – नोबेल पारितोषिकविजेते इंग्लिश लेखक
(मृत्यू: १९ जून १९९३)

१८६७

शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक, विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले.
(मृत्यू: ३१ जुलै १९६८)

१५५१

हेन्‍री (तिसरा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१५

जॅकी कॉलिन्स
२००८ मधील छायाचित्र

जॅकलिन जिल तथा जॅकी कॉलिन्स – इंग्लिश प्रणयकथा लेखिका व अभिनेत्री. त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच्या सर्व न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत होत्या.
(जन्म: ४ ऑक्टोबर १९३७ - हॅम्पस्टेड, लंडन, इंग्लंड)

(Image Credit: Wikipedia)

२००७

दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ‘डी. डी’ – संगीतकार
(जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

२००४

दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना
(जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००२

प्रिया तेंडुलकर

प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. ‘जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
(जन्म: १९ आक्टोबर १९५४)

(Image Credit: Wikipedia)

१९९३

दिनशा के. मेहता – निसर्गोपचार तज्ञ, महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार व निकटचे सहकारी
(जन्म: ? ? ????)

१९९२

ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे – साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)

१९६३

सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार
(जन्म: ७ एप्रिल १८९१ - ड्युनेडिन, न्यूझीलंड)

१९३६

पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक
(जन्म: १० ऑगस्ट १८६०)

१८८१

जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

१७२६

खंडो बल्लाळ चिटणीस – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक
(जन्म: ? ? ????)Pageviews

This page was last modified on 17 October 2021 at 9:10pm