भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ‘मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.
सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक
नंदा – अभिनेत्री
ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
(मृत्यू: ३ जानेवारी २००५)
एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ‘किंग ऑफ द रॉक अँड रोल’
(मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७)
सईद जाफरी – अभिनेता
(मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५)
केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक
(मृत्यू: ७ एप्रिल २००४)
राकेश मोहन – हिन्दी नाटककार
(मृत्यू: ५ डिसेंबर १९७३)
गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य
(मृत्यू: ४ मार्च २०००)
फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २६ आक्टोबर १९१६)
मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी
(जन्म: १ मे १९२२)
चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ५ मार्च १८९८)
नारायण भिकाजी तथा ‘नानासाहेब’ परुळेकर – ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: २० सप्टेंबर १८९८)
(Image Credit: @Drswapniltorne)
डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
(जन्म: १० डिसेंबर १८८० - नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)
बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक
(जन्म: १२ जुलै १९०९)
लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते
(जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक
(जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)
एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
(जन्म: ८ डिसेंबर १७६५)
गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)
मार्को पोलो – इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी
(जन्म: १५ सप्टेंबर १२५४)
This page was last modified on 18 September 2021 at 6:40pm