यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती
अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.
कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.
दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
रॉय क्लिफ्टन फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
(मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)
(Image Credit: WISDEN)
माला सिन्हा – हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री
बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ‘जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता
(मृत्यू: २९ जुलै २००३)
रुसी शेरियर मोदी – कसोटी क्रिकेटपटू
(मृत्यू: १७ मे १९९६)
गोपाळ नरहर तथा ‘मनमोहन’ नातू – ‘लोककवी’
(मृत्यू: ७ मे १९९१)
जीवटराम भगवानदास तथा ‘आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी
(मृत्यू: १९ मार्च १९८२)
मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न (१९९२)
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)
श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
(मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)
‘संगीतरत्न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु
(मृत्यू: २७ आक्टोबर १९३७)
(Image Credit: Wikipedia)
राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.
(मृत्यू: ४ जानेवारी १९०८ - मुंबई)
फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ
(मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)
पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
(जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)
यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते
(जन्म: २४ ऑगस्ट १९२९)
अरविंद मेस्त्री – शिल्पकार
(जन्म: ? ? ????)
यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते
(जन्म: ७ नोव्हेंबर १९४५)
कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ‘कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
(जन्म: २९ डिसेंबर १९०४)
मार्टिन ल्यूथर किंग सिनिअर (डॅडी किंग) – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
(जन्म: १९ डिसेंबर १८९७)
This page was last modified on 26 October 2021 at 11:55pm