वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या ‘प्रभाकर’ या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन
सई परांजप्ये – बालनाटय लेखिका, पटकथालेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका. स्पर्श, कथा, चश्म-ए-बद-दूर इ. पारितोषिक विजेत्या चित्रपटांच्या दिग्दर्शिका, पद्मभूषण (२००६), राज्यसभा सदस्य
(Image Credit: लोकसत्ता)
जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)
शंकर विष्णू तथा ‘दादा’ चांदेकर – चित्रपट संगीतकार
(मृत्यू: ? ? ????)
सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर
(मृत्यू: २० आक्टोबर १८९०)
सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक, भविष्यवेत्ते
(जन्म: १६ डिसेंबर १९१७ - माइनहेड, सॉमरसेट, इंग्लंड)
(Image Credit: IMDb)
नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज
(जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(जन्म: १३ जून १९०९)
जीवटराम भगवानदास तथा ‘आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी
(जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य
(जन्म: १६ मे १८२५)
This page was last modified on 15 December 2021 at 9:35pm