-: दिनविशेष :-

२९ डिसेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९५९

नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

१९५९

पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४२

राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य
(मृत्यू: १८ जुलै २०१२)

१९१७

रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते
मृत्यू: १२ डिसेंबर २००५)

१९०४

कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ‘कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
(मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)

१९००

मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते
(मृत्यू: २४ एप्रिल १९४२)

१८०८

अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ३१ जुलै १८७५)

१८००

चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक
(मृत्यू: १ जुलै १८६०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

टोनी ग्रेग

टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक
(जन्म: ६ आक्टोबर १९४६)

(Image Credit: Wikipedia)

१९८६

हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान
(जन्म: १० फेब्रुवारी १८९४)

१९६७

पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ‘प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
(जन्म: २४ जून १८९७)



Pageviews

This page was last modified on 05 October 2021 at 3:24pm