-: दिनविशेष :-

७ मे

जागतिक अस्थमा दिन


महत्त्वाच्या घटना:

२०००

व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२०००

कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान ‘फिडे मास्टर’ होण्याचा मान मिळाला.

१९९२

‘एन्डेव्हर’ हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

१९९०

लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

१९५५

‘एअर इंडिया’ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.

१९०७

मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.

१८४९

स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ‘कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ‘बेथुन कॉलेज’ मध्ये रुपांतर झाले आहे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८

नित्यानंद हळदीपूर

पं. नित्यानंद हळदीपूर – मैहर घराण्याचे बासरी वादक

(Image Credit: David Philipson)

१९२३

आत्माराम भेंडे – अभिनेते, दिग्दर्शक, लेखक. इंग्रजी रंगभूमीवर काम करणारे मराठी कलाकार.
(मृत्यू: ७ फेब्रुवारी २०१५)

१९१२

पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्‍या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
(मृत्यू: ६ एप्रिल १९८९ - अहमदाबाद, गुजरात)

१८९२

जोसेफ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ४ मे १९८०)

१८८०

पांडुरंग वामन तथा पां. वा. काणे – भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, संस्कृत पंडित, महामहोपाध्याय, विख्यात कायदेपंडित, भारतरत्‍न (१९६३)
(मृत्यू: ८ मे १९७२)

१८६१

रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ‘जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे.
(मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२१

प्रतीक चौधरी

प्रतीक चौधरी – सानिया घराण्याचे सतारिये, दिल्ली विद्यापीठातील संगीताचे प्राध्यापक (कोविड-१९)
(जन्म: ७ सप्टेंबर १९७१)

(Image Credit: @1anuradhapal)

२०२१

वनराज भाटिया

वनराज भाटिया – प्रतिथयश संगीतकार. चित्रपट, रंगभूमी, जाहिराती तसेच दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतील संगीत समर्थपणे हाताळणारे कुशल संगीतकार, त्यांनी ७००० हुन अधिक जिंगल्सना संगीत दिले आहे (Liril, Dulux). अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पार्श्वसंगीत व शीर्षकगीत त्यांच्या नावावर आहे. शाम बेनेगल यांच्या अंकुर, भूमिका, सरदारी बेगम असे १६ चित्रपट व तमस ही मालिका यांचे संगीत किंवा पार्श्वसंगीत त्यांचे आहे.
(जन्म: ३१ मे १९२७ )

(Image Credit: Scroll.in)

२००२

दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ
(जन्म: १० फेब्रुवारी १९१०)

२००१

मालती बेडेकर ऊर्फ ‘विभावरी शिरुरकर’ – लेखिका
(जन्म: १८ मार्च १९०५)

२००१

प्रेम धवन

प्रेम धवन – धरती के लाल (१९४६) या चित्रपटापासून त्यांनी आपल्या गीतलेखन कारकिर्दीला सुरुवात केली. ज़िद्दी (१९४६) या चित्रपटातील ‘चंदा रे जा रे’ या गाण्याने ते प्रकाशझोतात आले. नंतर आरजू (१९५०), तराना (१९५१), बडी बहू (१९५१), हमदर्द (१९५३), जागते रहो (१९५६), एक साल (१९५७), गेस्ट हाऊस (१९५९), हम हिंदुस्तानी (१९६०), काबूलीवाला (१९६१), शहीद (१९६५), एक फूल दो माली (१९६९), पवित्र पापी (१९७०) इ. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. अनिल बिस्वास, सलील चौधरी आणि चित्रगुप्त या संगीतकारांबरोबर त्यांची विशेष जोडी जमली. १९७० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(जन्म: १३ जून १९२३ - अंबाला, पंजाब)

(Image Credit:  Cinemaazi)

१९९४

उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर – ध्रुपद गायक
(जन्म: ? ? ????)

१९९१

गोपाळ नरहर तथा ‘मनमोहन’ नातू – ‘लोककवी’
(जन्म: ११ नोव्हेंबर १९११)



Pageviews

This page was last modified on 13 June 2021 at 5:35pm