युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.
एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
मुंबई येथे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ची स्थापना झाली.
थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्याचे पेटंट घेतले.
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.
पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक
संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका
(मृत्यू: २४ जून १९९७)
रावसाहेब गणपतराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे तिसरे अध्यक्ष व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक (२००१ - २००३).
यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते
(मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)
हॅरी मार्कोवित्झ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
सिकंदर बख्त – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
(मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
पं. बसवराज राजगुरू – किराणा घराण्याचे गायक
(मृत्यू: ? ? १९९१)
शिवराम हरी ‘राजगुरू’ – क्रांतिकारक
(मृत्यू: २३ मार्च १९३१)
बाळ गंगाधर तथा ‘बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त
(मृत्यू: ८ मार्च १९५७)
बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत.
(मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)
साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ‘तात्यासाहेब’ केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी’ व ‘मराठा’चे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्या,
दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.
(मृत्यू: १४ आक्टोबर १९४७)
नर्मदाशंकर दवे ऊर्फ ‘नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला.
(मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)
अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
(जन्म: २८ डिसेंबर १९५२)
कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ‘कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू
(जन्म: ३० जून १९२८)
शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
(जन्म: १४ जानेवारी १८९२)
सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक
(जन्म: ६ जुलै १८३७)
This page was last modified on 10 September 2021 at 7:46pm