जाक्स शिराक फ्रान्सचे २२ वे राष्ट्राध्यक्ष बनले
(कार्यकाल: १७ मे १९९५ ते १६ मे २००७).
(Image Credit: Wikipedia)
लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय
दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
‘न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज’ (NYSE) च्या कामकाजास सुरुवात झाली.
कुसय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा
(मृत्यू: २२ जुलै २००३)
भागवत चंद्रशेखर – लेगस्पिनर
होरॅस डॉज – ‘डॉज मोटर कंपनी‘चे संस्थापक
(मृत्यू: १० डिसेंबर १९२०)
‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार
(मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)
एडवर्ड जेन्नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर
(मृत्यू: २६ जानेवारी १८२३)
सज्जनलाल पुरोहित ऊर्फ ‘सज्जन’ – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते, कवी व गीतलेखक. काबूलीवाला (१९६१), दूर गगन की छाँव में (१९६४), सावन की घटा (१९६६), दिल दिया दर्द लिया (१९६६), राम और शाम (१९६७), फर्ज़ (१९६७), तलाश (१९६९), प्रेम पुजारी (१९७०), जॉनी मेरा नाम (१९७०), पगला कहीं का (१९७०), दुश्मन (१९७१), राजा जानी (१९७१), जहरीला इंसान (१९७४), दस नंबरी (१९७६), ईमान धरम (१९७७), दो और दो पाँच (१९८०), दोस्ताना (१९८०), कालिया (१९८१) इ. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. विक्रम और बेताल या मालिकेत त्यांनी केलेल्या बेतालच्या भूमिकेला विशेष प्रसिद्धी मिळाली.
(जन्म: १५ जानेवारी १९२१ - जयपूर, राजस्थान)
(Image Credit: IMDb)
डोना समर – अमेरिकन गायिका
(जन्म: ३१ डिसेंबर १९४८)
रुसी शेरियर मोदी – कसोटी क्रिकेटपटू
(जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)
प्रा. डॉ. माधव रामचंद्र तथा एम. आर. भिडे – पदार्थविज्ञान, जैविक तंत्रज्ञान आणि संपर्कशास्त्र या विषयांतील शास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाच्या शिक्षण माध्यम संशोधन संस्थेचे (EMRC)
संस्थापक-संचालक
(जन्म: ? ? ????)
शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन. गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा त्यांनीच बनवला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे (१९६१). मध्यप्रदेशातील धार येथे असलेल्या त्यांच्या स्टुडिओत त्यांनी केलेले
१०० पुतळे ठेवले आहेत.
(जन्म: २७ जानेवारी १८८४)
This page was last modified on 05 October 2021 at 11:37pm