अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.
(Image Credit: University of Amsterdam)
नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.
भारत पाक युद्ध – भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
‘विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.
(Image Credit: Created by MesserWoland, Fair use, Link)
अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (१९६५ - १९८६)
(मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)
(Image Credit: On This Day)
नानिक अमरनाथ भारद्वाज तथा लाला अमरनाथ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर
(मृत्यू: ५ ऑगस्ट २००० - नवी दिल्ली)
(Image Credit: ESPN CricInfo / WISDEN)
आत्माराम रावजी देशपांडे तथा ‘कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, मालवण येथे १९५८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष. ‘प्रेम आणि जीवन’, ‘भग्नमूर्ती’, ‘चिनी मुलास’, ‘निर्वासित’ ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले आहे.
(मृत्यू: ८ मे १९८२)
(Image Credit: आठवणीतली गाणी)
विनायक नरहरी तथा आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, तत्त्वज्ञ, भारतरत्न (१९८३, मरणोत्तर), १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. शांतिमय क्रांतीचे कार्य करण्याकरता त्यांनी ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत्’ची घोषणा त्यांनी दिली
(मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२ - पवनार आश्रम, वर्धा)
(Image Credit: Wikipedia)
क्रीडामहर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(जन्म: १० आक्टोबर १९०९ - अहमदनगर, महाराष्ट्र)
(Image Credit: ENNS - Past Students’ Association)
महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, कादंबरीकार व लघुकथाकार, हिंदी साहित्याच्या छायावादी परंपरेतील चार आधारस्तंभांपैकी एक स्तंभ, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ‘यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२) देण्यात आला.
(जन्म: २६ मार्च १९०७ - फरुखाबाद, उत्तर प्रदेश)
(Image Credit: Wikipedia)
गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक
(जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ - शेओपूर, मध्यप्रदेश)
(Image Credit: Wikipedia)
कैद-ए-आझम बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल
(कैद-ए-आझम = Great Leader)
(जन्म: २५ डिसेंबर १८७६)
(Image Credit: Wikipedia)
This page was last modified on 05 October 2021 at 12:07am