-: दिनविशेष :-

१० आक्टोबर

जागतिक मानसिक आरोग्य दिन

जागतिक मृत्यूदंड निषेध दिन

राष्ट्रीय टपाल दिवस


महत्त्वाच्या घटना:

१९९८

आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७५

पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९६४

जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६०

विद्याधर गोखले यांच्या ‘सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९५४

श्यामची आई चित्रपटाचे पोस्टर

आचार्य अत्रे निर्मित ‘श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.

(Image Credit: IMDb)

१९४४

दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.

१९४२

सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५४

रेखा

रेखा – दोन तीन पिढ्यातील चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी चित्रपट अभिनेत्री

(Image Credit: Cinestaan)

१९१६

डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक
(मृत्यू: २० मे १९९२)

१९१०

शिजियाझुआँग, हेबेई, चीन येथील पुतळा
शिजियाझुआँग, हेबेई, चीन येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा पुतळा

डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक
(मृत्यू: ९ डिसेंबर १९४२)

(Image Credit: Wikipedia)

१९०९

एन. डी. नगरवाला

क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ - पुणे, महाराष्ट्र)

(Image Credit: ENNS - Past Students’ Association)

१९०६

आर. के. नारायण
२००९ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – प्रतिथयश लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. राज्यसभा सदस्य (१२ मे १९८६ ते ३१ मे १९९२). ‘द गाईड’, ‘सॉरी नो रूम’, ‘द वर्ल्ड ऑफ नागराज’, ‘वेटिंग फॉर महात्मा’ इ. कादंबर्‍या, तसेच ‘मालगुडी डेज’, ‘ए हॉर्स अँड टू गोट्‌स’ इ. कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. ‘द गाईड’ ही त्यांची कादंबरी देशातील अनेक विद्यापीठांत बी. ए. (इंग्लिश) च्या अभ्यासक्रमात होती. या कादंबरीवर चित्रपटही निघाला आहे.
(मृत्यू: १३ मे २००१)

(Image Credit: Wikipedia)

१९०२

के. शिवराम कारंथ

के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते, विचारवंत आणि व्यासंगी विद्वान. त्यांना साहित्य अकादमी पारितोषिक (१९५९), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९७३), ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८), साहित्य अकादमी फेलोशिप (१९८५), पद्मभूषण इ. सन्मानांनी गौरविण्यात आले होते. इंदिरा गांधी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांनी आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता.
(मृत्यू: ९ डिसेंबर १९९७ - मणिपाल, कर्नाटक)

(Image Credit: Wikipedia)

१८९९

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक संस्थापक सदस्य व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष, चौथ्या लोकसभेतील खासदार (मुंबई दक्षिण-मध्य). त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ सन्मान प्रदान करण्यात आला.
(मृत्यू: २२ मे १९९१)

(Image Credit: Wikipedia)

१८७१

शंकर श्रीकृष्ण देव

शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक
(मृत्यू: २३ एप्रिल १९५८)

(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)

१८४४

बद्रुद्दिन तैय्यबजी

बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले प्रभारी मुख्य न्यायमूर्ती
(मृत्यू: १९ ऑगस्ट १९०६ - लंडन)

(Image Credit: Wikipedia)

१७३१

हेन्‍री कॅव्हँडिश

हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि अरगॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, पृथ्वीची घनता मोजणारा पहिला शास्त्रज्ञ
(मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)

(Image Credit: podomatic)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

जगजीतसिंग

जगजीतसिंग – गझलगायक
(जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)

(Image Credit:  @Bollywoodirect)

२००८

रोहिणी भाटे

रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका
(जन्म: १४ नोव्हेंबर १९२४ - पाटणा, बिहार)

(Image Credit: Wikipedia)

२००६

सरस्वतीबाई राणे

सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची कन्या. शास्त्रीय गायनाबरोबरच त्या ख्याल, ठुमरी, भजन व अभंगही गात असत.
(जन्म: ४ आक्टोबर १९१३ - मिरज)

(Image Credit: parrikar.org)

२०००

सिरीमावो बंदरनायके

सिरीमावो बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ‘सिलोन’ हे नाव बदलून ‘श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलकंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.
(जन्म: १७ एप्रिल १९१६)

(Image Credit: varnam)

१९८३

सुलोचना
१९२० मधील छायाचित्र

रुबी मायर्स ऊर्फ ‘सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (१९७३)
(जन्म: ? ? १९०७ - पुणे)

१९६४

गुरू दत्त
मिस्टर अँड मिसेस ५५

वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ‘गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांचे ‘चौदहवी का चांद’, ‘कागज के फूल’, ‘सीआयडी‘, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘आरपार’ आणि ‘प्यासा’ इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम’ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले.
(जन्म: ९ जुलै १९२५ - पदुकोण, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)

(Image Credit: Wikipedia)

१८९८

मणिलाल नभुभाई द्विवेदी

मणिलाल नभुभाई द्विवेदी– गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते
(जन्म: २६ सप्टेंबर १८५८ - नाडियाद, गुजरात)

(Image Credit: Wikipedia)



Pageviews

This page was last modified on 10 October 2021 at 7:05pm