-: दिनविशेष :-

२ मार्च


महत्त्वाच्या घटना:

२००१

मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.

१९६९

फ्रेन्च बनावटीच्या ‘कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या) विमानाचे यशस्वी उड्डाण

१९७८

स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

१९७०

ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.

१९५६

मोरोक्‍कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९५२

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री (धनबाद, झारखंड) येथील खत कारखान्याचे उद्‍घाटन झाले. हा भारतातील पहिला खत कारखाना आहे.

१९४६

हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

१९०३

मार्था वॉशिंग्टन हॉटेल
२००३ मधील छायाचित्र

फक्त महिलांसाठी असलेले ‘मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.

(Image Credit: Wikipedia)

१८५७

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट सुरू झाले.

१८५५

अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७७

अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू

१९३१

राम शेवाळकर – मराठी साहित्यिक
(मृत्यू: ३ मे २००९)

१९३१

मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते

१९२५

शांता जोग

शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

(Image Credit: Cinestaan)

१७४२

विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
(मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४

पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न
(जन्म: ? ? ????)

१९८६

डॉ. काशिनाथ घाणेकर

डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते, मराठीतील पहिले सुपरस्टार, हे शिक्षणाने दंतवैद्य (Dentist) होते. तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू, गुंतता हृदय हे, आनंदी गोपाळ इ. नाटके तर मराठा तितुका मेळवावा, पाठलाग, दादी माँ (हिंदी), मधुचंद्र, एकटी, प्रीत शिकवा मला, देवमाणूस, गारंबीचा बापू, अजब तुझे सरकार, झेप, घर गंगेच्या काठी, हा खेळ सावल्यांचा, चंद्र होता साक्षीला हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
(जन्म: १४ सप्टेंबर १९३२ - चिपळूण)

(Image Credit: Wikipedia)

१९४९

सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
(जन्म: १३ फेब्रुवारी १८७९)

१९३०

डी. एच. लॉरेन्स
तरुणपणीचे छायाचित्र

डेविड हर्बर्ट तथा डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार
(जन्म: ११ सप्टेंबर १८८५)

(Image Credit: University of Nottingham)

१७००

मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन
(जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)

१५६८

मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई
(जन्म: ? ? ????)



Pageviews

This page was last modified on 12 September 2021 at 6:35pm